Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड आहा! सोशल मीडियावर दोन दिवसांपासून सुरु आहे ‘जन्नत गर्ल’च्या ‘त्या’ फोटोंची चर्चा

आहा! सोशल मीडियावर दोन दिवसांपासून सुरु आहे ‘जन्नत गर्ल’च्या ‘त्या’ फोटोंची चर्चा

सन २००८ मध्ये, इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी, सोनल चौहान मोठ्या पडद्यापासून सध्या दूर आहे. सोनल बर्‍याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. परंतु, असे असूनही दरदिवशी तिची चर्चा होत असते. याचे कारण म्हणजे, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो इंटरनेटवर दररोज व्हायरल होतात. आजकाल सोनल चौहान पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच सोनलने सलवार सूटमध्ये सुंदर असे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, जे आता प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. आपण पाहू शकतो की, यात तिने पांढऱ्या रंगाचा सलवार परिधान केला आहे. सोबत केस मोकळे सोडून, तिने कानामध्ये जड दागिने घातलेले दिसत आहेत. या फोटोतील तिच्या घायाळ करणाऱ्या अदा, कोणालाही वेड लावण्यासाठी पुरेश्या आहेत.

याअगोदर सोनलने तिचे काही बोल्ड फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यालाही चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये अभिनेत्रीचा लुक अगदी भुरळ पाडणारा होता. सोनल सतत आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते, जे बघता बघताच व्हायरलही होतात.

सोनल चौहान अभिनेत्रीसह एक गायिकाही आहे. ती विशेष करून तमिळ चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनलला प्रथम हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये पाहिले गेले होते. तिने ‘३जी’ चित्रपटामध्ये गायक के के सोबत एक गीतही गायले होते.

अभिनेत्रीने ‘जन्नत’व्यतिरिक्त ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘पेहला सितारा’, ‘३जी’, ‘जॅक अँड दिल’, ‘स्कायफायर’ आणि ‘द पावर’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘रेनबो’, ‘चेलूवेये निन्ने नोडालू’, ‘लेजेंड’, ‘शेर’, ‘साईझ झिरो’ आणि ‘रुलर’ यांसारख्या दक्षिणी चित्रपटातही झळकली आहे.

हे देखील वाचा