प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्यामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, अलीकडेच सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, तो एका वर्षासाठी संगीत जगतापासून ब्रेक घेणार आहे. आता या दाव्यांवर त्यांची मुलगी आणि गायिका खतिजा रहमानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
वडिलांनी एक वर्षाचा ब्रेक घेतल्याचे वृत्त त्याने फेटाळून लावले आहे. अनेक रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स मध्ये असा दावा करत होते की एआर रहमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील सततच्या समस्यांमुळे एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. या दाव्यांना उत्तर देताना, खतिजा हिने X वर एका पोस्टमध्ये लिहिले, “कृपया अशा निरुपयोगी अफवा पसरवणे थांबवा.”
संगीतकार ए आर रहमान याने नुकतेच जाहीर केले की तो आणि त्यांची पत्नी सायरा बानो वेगळे होत आहेत. दोघे पती-पत्नी म्हणून २९ वर्षे एकत्र होते. ही बातमी रहमानने 19 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याने लिहिले, “आम्ही तीस वर्षे एकत्र घालवण्याची आशा केली होती, परंतु प्रत्येक गोष्टीचा अदृश्य अंत आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कोटींमध्ये मानधन घेतो पुष्पा २ मधील भंवर सिंग; जाणून घ्या अभिनेत्याची संपत्ती…