युट्यूबवर सध्या हटके सिरीजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. सध्या अशीच एक सिरीज सध्या युट्यूबवर गाजत आहे. प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया व अनुष्का मोशन पिक्चर्स व एंटरटेनमेंट यांनीची निर्मिती असलेल्या ‘ग्रामदैवत’ सिरीजलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कडक मराठी’ युट्यूब चॅनेलवर पब्लिश होत असलेल्या या सिरीजचा पहिला भाग रविवारी 2 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज झाला.
नक्की काय आहे ग्रामदैवत सिरीजचा उद्देश
ग्रामदैवत ही एक डॉक्युमेंटरी प्रकारची सिरीज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जी मंदिरं, देवस्थानं ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांची संपुर्ण माहिती दिली जाणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स व एंटरटेनमेंटच्या संकेत पावसे यांची ही संकल्पना असून तृप्ती देवरे याच्या निवेदिका आहेत. यामधून ग्रामदैवतांचा समृद्ध असा इतिहास लोकांसमोर आणला जाणार आहे. तसेच केवळ मंदिरं, देवस्थानं यांचीच माहिती न देता त्या शहराचा इतिहास व वर्तमान आपल्या समोर मांडला जाणार आहे. या सिरीजसाठी संशोधन व लेखन मंगेश कुलकर्णी यांनी केले आहे. मंगेश कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आणि धर्म, कला, साहित्य, संस्कृतीचे अभ्यासक आहेत. Wavelenth Brandcom या शोचे निर्मिती करत आहेत.
पहिल्याच भागात अहिल्यानगरच्या विशाल गणपती बाप्पांची माहिती
या सिरीजच्या पहिल्या भागात अहिल्यानगरचे (पुर्वीचे अहमदनगर) ग्रामदैवत असलेल्या ‘विशाल गणपती’ देवस्थानची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नगर शहराची सुंदर दृश्य, विशाल गणपतीचा इतिहास व माहिती देण्यात आली आहे. ‘आपण नेहमीच युट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती, मनोरंजनपर गोष्टी पहात असतो. अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवरुन शिकतो देखील. परंतू देवस्थाने, मंदिरे यांचा समृद्ध इतिहास हा आपल्याला इथे फारसा पाहायला मिळत नाही. याचमुळे आम्ही हा प्रयोग करण्याचे ठरवले,’ असे सिरीजबद्दल बोलताना निर्माते नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया म्हणाले.
येत्या काळात पाहायला मिळणार महाराष्ट्रातील अनेक ग्रामदैवतांचे वैभव
‘येत्या काळात आम्ही याच सिरीजच्या माध्यमातून फारसे माहित नसलेले किंवा इतिहास समोर न आलेल्या ग्रामदैवत, मंदिरं आणि देवस्थानांचा इतिहास समोर आणणार आहोत. पहिल्या एपिसोडपासूनच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय, याचा नक्कीच आनंद होतोय,’ असे सिरीजबद्दल बोलताना संकेत पावसे म्हणाले.
संपुर्ण सिरिज पाहा इथे
https://youtu.be/4DZrS8SkAQA?si=vbXydZPJx7zr84SH