अभिनेता अर्जुन कपूर याचा चित्रपट सरदार का ग्रॅंडसन लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आजी आणि नातवावर आधारित आहे. एखाद्या नातवाला आपल्या आजीची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते, परंतु ती पूर्ण करताना काय होते ते चित्रपटाची कहाणी आहे. आता नुकताच अर्जुनने सांगितले की, आपल्या आजीची एक इच्छा खऱ्या आयुष्यात तो पूर्ण करू शकत नाही.
अर्जुन म्हणाला की, ‘माझ्या आजीची इच्छा आहे की, तिला तिच्या नातवंडांची मुले बघायची आहेत. पण मी देऊ शकत नाही. आता आम्ही कपूर खानदानच्या सर्व विवाहित मुलांकडून लवकरात लवकर आजीची ही इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा करत आहोत.’
पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘आजीने मला पत्र पाठवले आहे. त्यात सोनमच्या लग्नानंतर आता, तू पण लवकर लग्न करावेस, अशी इच्छा आजीने व्यक्त केली आहे.’
आजीचे हे पत्र अर्जुनला भेट म्हणून मिळाले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना अर्जुन म्हणाला होता की, ‘सध्या कामावरच २-३ वर्ष लक्ष द्यायची इच्छा आहे.’ सगळ्यात महत्वाचा म्हणजे अर्जुन म्हणाला होता की, ‘घरात आत्ता खूप लग्न पार पडले आहेत, त्यामुळे मी पुरता दमून गेलो आहे.’
आता अजूनही अर्जुनच्या आजीला, नातवाच्या लग्नाची आस लागून राहिली आहे हे नक्कीच. त्यामुळे आजी आणि चाहते सगळेच अर्जुनच्या लग्नाची बातमी कधी येते याच्या प्रतिक्षेत आहेत.
काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्याचे अर्जुनने सांगितले होते. कुत्रा चावण्याची खूण त्याच्या पायावर कायम राहणार आहे, असे तो म्हणाला आहे.
अर्जुन कपूर ‘सरदार का ग्रॅंडसन’ चित्रपटातून डिजिटल डेब्यू करणार आहे. आपल्या पदार्पणाविषयी बोलताना अर्जुनने सांगितले की, आपण सध्या जगात साथीच्या आजाराशी लढा देत आहोत. यावेळी माझा चित्रपट प्रदर्शित होणे आणि कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणे हे माझ्यासाठी खूप रोमांचक आहे. हा एक प्रसंग आहे, जेव्हा माझा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये उपशीर्षकांसह पाहिला जाईल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आजही सुशांतला आपला आवडता सहकारी अभिनेता मानते अंकिता लोखंडे; म्हणाली…
-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर
-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल










