टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे जिने तिच्या अभिनयाने अक्षरशः सर्वांना वेड लावले आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अर्चनाने सर्वांच्या मनात तिच्याबद्दल एक जागा निर्माण केली आहे. अंकिता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. यासोबतच ती विक्की जैनसोबत असलेल्या नात्यामुळे देखील खूप चर्चेत आहे. अंकिता ही गेल्या तीन वर्षांपासून विकी जैन सोबत रिलेशनमध्ये आहे. तसेच ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, अशी बातमी देखील समोर आली आहे.
अंकिता लोखंडेने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे की, ती लवकरच लग्न करणार आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत तिने या गोष्टी सांगितल्या होत्या.
अंकिता लोखंडेने दिलेल्या या मुलाखतीत सांगितले होते की, “लग्न ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव असतो. मी माझ्या लग्नासाठी खूप उत्साहित आहे. मी लवकरच लग्न करणार आहे. मी अशी आशा करते की, तो दिवस लवकरच येईल. मला जोधपूर किंवा जयपूरमध्ये लग्न करायला आवडेल. मला राजस्थानी पद्धतीने लग्न करायला आवडेल. पण मी अजून याबाबत कोणतेच प्लॅनिंग केलेले नाहीये.”
विकी जैनसोबत असलेल्या तिच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल बोलताना तिने सांगितले की, “मला असे वाटते की, प्रेम हे आयुष्यात खूप गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी केवळ प्रेमाच्या अपेक्षेत असते. प्रेम हे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आणि अविभाज्य गोष्ट आहे. मी प्रेमाबाबत खूप हळवी आहे. जर मला असे वाटले की, माझ्या सोबत कोणी खोटे बोलत आहे, तर मी खरं जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असते.”
अंकिता लोखंडेने पुढे सांगितले की, “माझ्या मते तुमच्या नात्यात विश्वास असणे खूप गरजेचे आहे. विश्वास तुमच्या नात्याला अजून मजबूत बनवतो. मला खोटं बोलणारी माणसे अजिबात आवडत नाहीत.” या दरम्यान ती सुशांत सिंगबद्दल देखील बोलली की, “सुशांत माझा आवडता को- स्टार आहे.”
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत हे दोघेही पवित्र रिश्ता या मालिकेत भेटले होते. ते दोघे अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. पण त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. नंतर सुशांतने ही मालिका सोडून दिली. त्याला बॉलिवूडअमध्ये अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली. मागच्या वर्षी सुशांत सिंगच्या मृत्युने सर्वांना खूप धक्का बसला होता. अंकिताला देखील या गोष्टीचे खूप दुःख झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर