Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड वयाव्या २० व्या वर्षीच सोनल चौहान बनली होती ‘मिस वर्ल्ड टुरिझम’, वाढदिवशीच रिलीझ झाला होता तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट

वयाव्या २० व्या वर्षीच सोनल चौहान बनली होती ‘मिस वर्ल्ड टुरिझम’, वाढदिवशीच रिलीझ झाला होता तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट

बॉलिवूडमध्ये ‘जन्नत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे सोनल चौहान. सुपरस्टार इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत’ या चित्रपटात काम केल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे सर्वांना असे वाटले होते की, ही चित्रपटसृष्टी गाजवणार आहे. परंतु असे काहीच झाले नाही. जन्नत चित्रपटानंतर तिने थोड्याफार चित्रपटात काम केले, पण नंतर तिचे चित्रपट काही चालले नाहीत. शेवटी ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. पण सोनल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोनल रविवारी (16 मे) आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 16 मे, 1987 रोजी मध्ये उत्तरप्रदेशमध्ये एका रॉयल कुटुंबात झाला आहे. तिचे कुटुंब मणिपूरच्या रॉयल राजपूत घराण्यामधून आहे. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास घटना.

सोनल चौहान चित्रपटात येण्याआधी मॉडेलिंग करत होती. ती पहिली भारतीय स्त्री होती जिला मिस वर्ल्ड टुरिझम 2005 चा पुरस्काराने सन्मानित केले होते. म्हणजेच तिने वयाच्या विसाव्या वर्षी ‘मिस वर्ल्ड टुरिझम’चा किताब आपल्या नावावर केला होता. सोनलला सर्वात आधी हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’ या म्युझिक अल्बममध्ये पाहिले होते. जन्नत या चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल देशमुख यांनी सोनलला मुंबईमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये पाहिले होते. त्यांनतर त्यांनी सोनलला कास्ट केले आणि चित्रपटाची शूटिंग चालू केली.

या चित्रपटात सोनल इमरान हाश्मीच्या विरुद्ध एका निरागस जोया माथूर नावाच्या मुलीचे पात्र निभावत होती. विशेष म्हणजे जन्नत चित्रपट हा तिचा पहिलाच चित्रपट असून तिच्या वाढदिवशीच रिलीझ झाला होता. या चित्रपटासाठी सोनलला फिल्मफेअर अवॉर्ड 2009 मध्ये नॉमिनेशन देखील मिळाले होते. या सोबतच तिने ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘पहिला सितारा’, ‘3 जी’, ‘पलटन’, ‘जॅक अँड दिल’ या चित्रपटात काम केले आहे. हे चित्रपट जास्त चालले नाही. पण सोनलच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले.

सोनलने केवळ हिंदी चित्रपटात नाही, तर टॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. सोबतच तिने अनेक मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट देखील केले आहे. सोनलच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही या वरूनच लावू शकता की, सोनलच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या एका चाहत्याने तीला 8000 गुलाबजाम पाठवले होते. पण त्याचे नाव देखील लिहिले नव्हते.

पत्रकारितेत रस असल्याने सोनलने दिल्ली मधील गार्गी कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतरही तिने तिचे शिक्षण चालू ठेवले होते. परंतु तिच्या नशिबात कदाचित चित्रपटसृष्टी होती. त्यामुळे ती चित्रपटात काम करू लागली. ती जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द पावर’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत विद्युत जामवाल आणि श्रुती हासन यांचाही समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘किंग खान’च्या घरात राहायचंय? तर एका रात्रीसाठी मोजावे लागतील तब्बल ‘इतके’ लाख रुपये; पाहा आलिशान घराचे फोटो

-‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा

-‘एकच नंबर दिसतेय!’ ‘आर्ची’च्या साडीतील अदांनी पुन्हा लावले चाहत्यांना वेड; पडतोय लाईक्स अन् कमेंट्सचा मोठ्ठा पाऊस

-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी

हे देखील वाचा