सन 2012 मध्ये ‘इश्कजादे’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करणारा अभिनेता अर्जुन कपूरने चित्रपटसृष्टीतील 9 वर्ष पूर्ण केली आहेत. या नऊ वर्षाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. कॉमेडीपासून ते अनेक ऍक्शन चित्रपटामध्ये त्याने काम केले आहे. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वतःची प्रशंसा करत स्वत: ला एक यशस्वी कमर्शिअल अभिनेता म्हटले आहे. यासोबतच त्याने त्याच्या करिअरबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अर्जुन कपूरने त्याच्या मुलाखतीत सांगितले की, “मला तर आता इंडस्ट्रीमध्ये 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु मला 90 वर्षे होईपर्यंत इंडस्ट्रीमध्ये काम करायचे आहे. मी कॅमेऱ्यासमोर असो किंवा नसो मला काहीही फरक पडत नाही.”
तिथेच त्याने सोशल मीडियाबाबत बोलताना सांगितले की, “मी लोकांसाठी खूप सोप्पं टारगेट आहे. पण मला सगळ्यांना सांगावेसे वाटते की, जसे लोक मला समजतात त्यापेक्षा मी खूप चांगला आहे. त्यामुळे मी अनेक लोकांकडे दुर्लक्ष करत असतो. कारण मी जर वाद घालत असलो, तर त्यात माझेच नाव खराब होईल.”
https://www.instagram.com/p/CO5Fp2HpQkJ/?utm_source=ig_web_copy_link
अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो त्याच्या ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटासाठी तो खूपच उत्साहित आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, नीना गुप्ता आणि अदिती राव हैदरी दिसणार आहेत. या सोबतच तो ‘भूत पुलिस’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असणार आहे.
अर्जुन कपूर हा मलायका अरोरा सोबत रिलेशनमध्ये असल्याने ती अनेक वेळा चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट केले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील त्या दोघांचे फोटो व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…
-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ










