सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राहते. इतकेच नव्हे, तर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल शेअर करून, ती अपडेट देत राहते.
नुकतेच श्रियाने स्वतः चे एक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री नदीच्या कडेला बसलेली दिसत आहे. तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर तिने पारंपरिक लुक केला आहे. विशेष म्हणजे तिच्या नाकातील नथ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत या लुकमध्ये श्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.
हा फोटो पोस्ट करत श्रियाने, ‘पृथ्वीची मुलगी’ असे कॅप्शन दिले आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी
-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन
-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल