Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

क्रॉप टॉपमध्ये अ‍ॅब्स दाखवताना दिसली अभिनेत्री श्वेता तिवारी; गझबच्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचं होतंय कौतुक

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आजकाल सतत चर्चेचा विषय बनते. आता व्यावसायिक ते वैयक्तिक आयुष्यामुळे श्वेता चर्चेत आहे. श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांविरूद्ध व्हिडिओ शेअर करुन, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. दुसरीकडे, ती ‘खतरों के खिलाड़ी सीझन ११’ मधील तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे.

श्वेता तिवारी आता साऊथ आफ्रिकेमध्ये शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये दिसत आहे. फोटोमध्ये श्वेता तिचे जबरदस्त शारीरिक परिवर्तन दर्शवताना दिसत आहे, जे पाहून प्रत्येकजण तिच्या फिटनेसने प्रभावित झाला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने असेही सांगितले आहे की, तिचा फोटो ‘बिग बॉस १४’ फेम अभिनव शुक्लाने क्लिक केला आहे.

अभिनव शुक्लाने यापूर्वीही आपले फोटोग्राफी स्किल चाहत्यांसमोर सादर केले आहेत. श्वेताचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. फोटोमध्ये ती जबरदस्त स्टाईलमध्ये पोज देत, तिचे अ‍ॅब्स दाखवत आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांसह सेलिब्रिटीही तिच्या फोटोवर कमेंट करत, तिचे कौतुक करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर श्वेता तिवारी अखेरच्या वेळेस वरुण बडोलाच्या समवेत ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेमध्ये झळकली होती. गेल्याच वर्षी ही मालिका ऑफ एअर झाली होती. ती टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मधील तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहचली होती. याशिवाय अभिनेत्री ‘नागीन’, ‘सीता और गीता’ आणि ‘परवरिश- कुछ खट्टी कुच्छ मीठी’ यांच्यासह टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा