मराठी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच कलाकार हे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. ते नेहमीच आपल्या आयु्ष्यातील बारीक- सारीक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. इतकेच नव्हे, तर ते आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओही शेअर करतात. यापैकीच एक आघाडीची अभिनेत्री म्हणजेच राजेश्वरी खरात होय. राजेश्वरीने जेमतेम दोनच चित्रपट केले आहेत. परंतु त्यातून तिने खूप प्रसिद्धी मिळवलीय. ती सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते की काही सांगायलाच नको. दररोज तिची एक तरी पोस्ट चाहत्यांना पाहायला मिळतेच. परंतु राजेश्वरीप्रमाणे सर्वच कलाकार आपल्या चाहत्यांच्या कमेंटला रिप्लाय देताना खूपच कमी दिसतात. आता अभिनेत्रीने आपल्या पोस्टवर केलेली एक विनंती खूपच चर्चेत आहे.
झाले असे की, राजेश्वरीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर श्री अध्यक्ष महोदय नावाच्या युजरने “खूप घमंडी आहे ही. ठराविक लोकांनाच रिप्लाय करते ही. चांगल्या कमेंट करणारांना बिलकुल दुर्लक्ष करते,” अशी कमेंट केली.
यानंतर अनेक युजर्सने या कमेंटवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या, परंतु अभिनेत्री राजेश्वरीने युजरला प्रत्युत्तर देत केलेल्या विनंतीने सर्वांचे लक्ष वेधले. राजेश्वरीने म्हणाली की, “हे रेकॉर्ड वरुन काढून टाका अध्यक्ष महोदय.” तिचा प्रत्युत्तर देण्याचा हा अंदाज चाहत्यांना फारच भावला आहे. त्यामुळेच तिच्या कमेंटला तब्बल ६०० पेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वीही राजेश्वरीने मजेशीर कमेंट करून चाहत्यांना खदखदून हसवले आहे.
काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना
अभिनेत्री राजेश्वरीला काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला होता. याची माहिती तिने व्हिडिओ पोस्ट करून दिली होती. त्यानंतर तिने कोरोनावर मात केल्याचीही पोस्ट शेअर केली होती. यावर चाहत्यांनी ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थनाही केली होती.
राजेश्वरीची कारकीर्द-
अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने सन २०१३ मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यात तिच्या वाट्याला फार डायलॉग्ज आले नाहीत, पण तिने आपल्या अभिनयाने मात्र कायमचा चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. त्यानंतर राजेश्वरी सन २०१७ मध्ये आलेल्या ‘आयटमगिरी’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला मात्र फँड्रीप्रमाणे यश मिळाले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
–तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी, पाहा राजेश्वरी कोणासाठी गातीये हे गाणे
–जब्याच्या शालुचा नखरा लय भारी!! अभिनेत्री राजेश्वरी खरातचा नवा व्हिडिओ पाहून चाहत्यांची दांडी गुल!