Thursday, July 24, 2025
Home साऊथ सिनेमा ३०० कोटींच्या ठग लाईफ मध्ये कोणाच्या झोळीत किती पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

३०० कोटींच्या ठग लाईफ मध्ये कोणाच्या झोळीत किती पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

कमल हासनच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. कमल हासनचा ‘ठग लाईफ‘ हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा तमिळ गँगस्टर ड्रामा मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून चांगली कमाई करत आहे. हा एक मोठा बजेटचा चित्रपट आहे ज्यासाठी कलाकारांनीही मोठी रक्कम घेतली आहे. ‘ठग लाईफ’च्या स्टारकास्टच्या फीबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

रिपोर्ट्सनुसार, ‘ठग लाईफ’ ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. कमल हासन आणि मणिरत्नम यांनी या चित्रपटावर पाण्यासारखे पैसे खर्च केले आहेत. स्टार्सच्या फीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

‘ठग लाईफ’मध्ये कमल हासन आणि त्रिशा कृष्णन यांच्यासोबत जोजू जॉर्ज, सिंबू, अशोक सेल्वन, अभिरामी, ऐश्वर्या लक्ष्मी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटात त्रिशा कृष्णा इंद्राणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने या चित्रपटासाठी १२ कोटी रुपये आकारले आहेत. जे त्यांच्या मागील ‘गुड बॅड अगली’ चित्रपटापेक्षा खूपच जास्त आहे. ‘गुड बॅड अगली’साठी त्यांना ४ कोटी मिळाले. सिलंबरसन टीआर यात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांना या चित्रपटासाठी ४० कोटी मिळाले आहेत. अशोक सेल्वन आणि जोजू जॉर्ज यांना प्रत्येकी १ कोटी मिळाले आहेत. अभिरामीला ५० लाख रुपये मिळाले आहेत.

कमल हासन आणि मणिरत्नम हे देखील चित्रपटाचे सह-निर्माते आहेत, म्हणून त्यांनी कोणतेही शुल्क घेतलेले नाही. ते नफ्यातील वाटा घेणार आहेत. हा या वर्षातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले आहे.

ठग लाईफ गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. खरंतर, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कमल हासन यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की कन्नड भाषा तमिळ भाषेतून आली आहे. त्यानंतर गोंधळ उडाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कर्नाटकात गोंधळ सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

हाऊसफुल ५ ठरला भारतातील सर्वात महागडा कॉमेडी सिनेमा; बजेट ऐकून वेडे व्हाल…

 

हे देखील वाचा