‘सीआयडी’ फेम अभिनेता ऋषिकेश पांडेची पत्नी त्रिशा दुशाब यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला आहे. 2004 मध्ये त्यांनी लग्न केले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचे पटत नव्हते. त्यांनतर 2014 पासून दोघांनी वेगळे राहायला सुरुवात केली आणि त्यांनतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता कुठे 7 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट मान्य झाला आहे. याबाबत बोलताना ऋषिकेशने त्याच्या मुलाची कस्टडी कोणाला मिळाली आहे हे सांगितले आहे. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आणि त्रिश्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
ऋषिकेशने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “बदलत्या काळासोबत आम्हाला असे समजले की, आमच्यामध्ये ताळमेळ कमी आहे. त्यांनतर आम्ही दोघांनी वेगळे राहण्याचा विचार केला. कारण आम्हाला वाटत नव्हते की, या गोष्टी अजून खराब व्हाव्यात. इतक्या वर्षापर्यंत मी यासाठी शांत होतो, कारण मी नेहमीच प्रायव्हसीचा आदर करतो. याबद्दल मी यासाठी बोलत आहे कारण आता आमचा घटस्फोट झाला आहे.”
ऋषिकेशने पुढे सांगितले की, “आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अजिबात राग नाहीये. मी आणि त्रिशाने खूप समंजसपणे ही गोष्ट हाताळली आहे. मी तिचे आणि माझ्या सासू-सासऱ्यांचे आभार मानतो की, त्यांनी आम्ही वेगळे होणार आहोत हा निर्णय मान्य केला आणि आम्हाला सपोर्ट केला.” त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा दक्ष याची कस्टडी ऋषिकेशला मिळाली आहे.
त्याने पुढे सांगितले की, “मी इतक्या दिवस शांत राहण्याचे कारण फक्त माझा मुलगा आहे. कारण मला नाही वाटत की, एवढ्या कमी वयात त्याच्या मनावर या गोष्टींचा प्रभाव व्हावा. तो आता 12 वर्षाचा झाला आहे. तो खूप समजदार आहे. त्याला माहित आहे की, आम्ही कोणत्या परिस्थितीतून गेलो आहोत.”
“आज भलेही मला मुलाची कस्टडी त्याला मिळाली आहे, पण तो त्याच्या आईला भेटण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. तो केव्हाही तिला भेटू शकतो. मी पूर्णवेळ शूटिंगमध्ये बिझी असतो. त्यामुळे मी त्याचा प्रवेश एका हॉस्टेलमध्ये केला आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा मी त्याच्या शाळेतील कार्यक्रमासाठी रात्रभर गाडी चालवून यायचो. पण तो माझे काम समजून घेतो. त्याला त्याच्या आईचा आणि आजी-आजोबांचा देखील खूप लळा आहे. त्यामुळे तो त्याला पाहिजे तेव्हा त्यांना जाऊन भेटी शकतो,” असेही आपल्या मुलाबद्दल बोलताना ऋषिकेश म्हणाला.
ऋषिकेश पांडे याचा जरी घटस्फोट झाला असला, तरीही त्याचा प्रेमावरचा विश्वास कायम आहे. त्याने सांगितले की, “तो आता तरी कोणत्याच नवीन नात्यासाठी तयार नाहीये, पण तो एकदम खुश आहे.”
ऋषिकेशने सीआयडीसोबत ‘यह रिश्ता क्या कहलाता है’, ‘जग जननी मां’, ‘वैष्णो देवी’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो