सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जे कोणालाही एक रात्रीत स्टार बनवू शकते. आजकाल एका छोट्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट अशी आहे की, यात तो मुलगा अरिजित सिंगचे प्रसिद्ध गाणे ‘सनम रे’ गात आहे. मुलाच्या आवाजात हे गाणे ऐकून नेटकरी त्याचे खूप कौतुक करत आहेत. राहुल ट्रेन सिंगरच्या नावाने या मुलाचा हा व्हिडिओ फेसबुकवर खूप पाहिला जात आहे.
वास्तविक फेसबुकवर एक पेज आहे, ज्याचे नाव ‘वन बीट’ असे आहे. या पेजवरून या मुलाचा व्हिडिओ २६ एप्रिल रोजी शेअर केला गेला होता. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारताची अज्ञात प्रतिभा. राहुल ट्रेन सिंगर.” व्हायरल व्हिडिओमध्ये छोटा मुलगा ट्रेनमध्ये दिसला आहे आणि अरिजित सिंगचे गाणे अगदी मनापासून गाताना दिसत आहे. त्याचे एक्सप्रेशन्स देखील पाहण्यासारखे आहेत.
https://www.facebook.com/watch/?ref=external&v=787963571861984
सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर ४० हजाराहून अधिक कमेंट्स आणि २२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, दीड दशलक्ष लाईक्स यावर आले आहेत. युजर्स सातत्याने हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि एकमेकांना त्याचा मधूर आवाज ऐकायला सांगत आहेत. विशेष म्हणजे, दोन दगडांच्या आधारे संगीत वाजवत, या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावर कमेंट करत, एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “या स्मार्ट मुलाचा आवाज खूप चांगला आहे.” एका युजरने लिहिले, “याच्या टॅलेंटला पुढे नेण्याची गरज आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “देव या मुलाला योग्य मार्गावर घेऊन जावो.” त्याचवेळी, बरेच युजर्स या मुलाचे समर्थन करण्याबद्दल बोलत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो