Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘राम भक्त कधी खोटं नाही बोलत’, म्हणत कंगना रणौतने केला कोरोना रिपोर्ट शेअर

बॉलिवूडमधील ‘धाकड गर्ल’ कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच बॉलिवूडमध्ये आणि आता राजकारणात देखील सर्वत्र चर्चेत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे तिला सर्वत्र ट्रोल केले जाते. प्रत्येक वेळी कंगनाने बॉलिवूडपासून ते अगदी भारताच्या राजकारणात अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अडचणीमध्ये तिने तिचे विचार देखील मांडले आहेत. तिचे विचार अनेकांना न पटल्यामुळे तिला अनेक वेळा ट्रोल केले जाते. त्यामुळे आता कंगना आणि वाद हे एक समीकरण झाले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कंगनाला कोरोना झाला होता. त्यामुळे आता लोकांनी तिच्याकडे ती कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट मागितला आहे, तेव्हा कंगनाने देखील तिच्या अंदाजात उत्तर दिले आहे.

लोकांना विचारलेल्या या प्रश्नावर तिने तिचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट शेअर करून सर्वांची बोलतो बंद केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला रिपोर्ट शेअर करून लिहिले आहे की, “सगळे राक्षस आहेत जे माझ्याकडे माझा कोरोना निगेटिव्ह असण्याचा रिपोर्ट मागत आहेत, कारण ते तसे आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण दुनिया तशी दिसत आहे. ही पोस्ट त्यांच्यासाठीच आहे. एक राम भक्त कधी खोटं बोलत नाही. श्री राम.”

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत कंगना रणौतला कोरोनाची लागण झाली होती. तिने 10 मेला ती पॉझिटिव्ह असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर केवळ 10 दिवसातच तिने कोरोनावर मात केली आणि ती आता सुखरूप आहे.

या आधी तिने पोस्ट करून सांगितले होते की, तिने कोरोनाला कसे हरवले. तिने सांगितले की, यावर तिला खूप काही बोलायचे आहे पण ती नाही बोलणार. यांनतर तिने एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात तिने सांगितले की, कोरोना दरम्यान तिने काय काय केले. या व्हिडिओनंतर तिच्याकडे सर्वांनी ती निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट मागितला होता.

या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, “मागच्या वेळेस मी जी पोस्ट केली होती ती अनेक जणांना आवडली नव्हती. कारण मी तेव्हा म्हटले होते की, या कमी कालावधीत या विषाणूला हरवायचे. इथे काही स्वतंत्र नाहीये. काही नकारात्मक लोकांनाच ग्रूप आहे. पण माझी बहीण म्हणाली की, जर या लोकांना शक्य झाले, तर हे श्वास देखील रोखून ठेवतील त्यामुळे अशा लोकांना जास्त डोक्यावर नाही बसवायचे. म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

हे देखील वाचा