बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट “राधे: योर मोस्ट वाँटेड भाई” हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. देशात कोरोनाचा फैलाव पाहता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि ज्या ठिकाणी चित्रपटगृह चालू आहेत त्या ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पे पर व्ह्यू प्लॅटफॉर्मवर बघता येत आहे. हा चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला 249 रुपये द्यावे करावे लागत आहेत. लाखो लोकांनी हा चित्रपट अधिकृतरीत्या पहिला आहे, पण तरीही हा चित्रपट पायरसीचा शिकार झाला आहे.
याआधी सलमान खानने एक व्हिडिओ शेअर करून पायरसी पासून लांब रहा असा संदेश दिला होता, पण अनेकजन याचे उल्लंघन करत आहे. सलमान खानच्या या पोस्टनंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझने मुंबई सायबर सेलमध्ये या चित्रपटाच्या पायरसीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांनतर सायबर सेलने या गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी फेसबुकवरील एका युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.
हा फेसबुक युजर अनधिकृत पद्धतीने हा चित्रपट डाऊनलोड करून पायरेटेड व्हर्जन 50 रुपयात व्हॉट्सऍपवर विकत होता. वृत्तांनुसार, सलमान खानच्या या चित्रपटाच्या मार्केटिंग हेड अपर्णा देसाई यांनी सांगितले की, हा चित्रपट व्हॉट्सऍपवर पाच भागात पाहायला मिळत आहे. यांनतर झीने एँटी पायरेसी एजेंसी एपिक्स सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा पायरेटेड व्हिडिओ मेसेंजरवरून काढून टाकण्यास सांगितले.
अश्विनी राघव नावाच्या एक युजरने फेसबुक पोस्ट केली होती की, ती 50 रुपयात हा चित्रपट व्हॉट्सऍपवर विकत आहे. या पोस्टची पडताळणी करण्यासाठी टीममधील एकाने त्या युजरकडे हा चित्रपट पाहिजे असल्याची मागणी केली. अश्विनीने त्यांना 50 रुपये पाठवायला सांगितले. जेव्हा त्यांनी 50 रुपये पाठवले, तेव्हा त्याने राधे चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन पाठवले होते. अश्विनी सोबत आणखी दोन लोकांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे.
सलमान खानच्या राधे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 100 कोटी पेक्षाही जास्त कमाई केली आहे. या कोरोना काळात देखील सलमान खान पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत ट्रेंड सेंटर बनला आहे. त्याचे हे हायब्रीड प्रदर्शित करण्याचे सूत्र यशस्वी झाले आहे. त्यामुळे त्याचे आता असे म्हणणे आहे की, जरी चित्रपटगृह चालू नाही झाली, तरीही तो त्याचा पुढचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ










