सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, त्यामुळे सर्वजण घरातच बसले आहेत. अशातच चित्रपट सृष्टीला देखील या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. भारतातील शूटिंग बंद झाली आहे. त्यामुळे अनेक कलाकार आज घरातच आहेत. पण घरात बसूनही ते प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू देत नाहीत. ते त्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच गोलमाल फेम अभिनेता कुणाल खेमू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
कुणाल खेमूचा हा व्हिडिओ सैफ अली खानची बहीण आणि कुणालची पत्नी सोहा अली खान हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोहा छतावर आहे. ती तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान दाखवत असते. तेवढ्यात कुणाल तिथे त्यांच्या कुत्र्यासोबत गाणे म्हणत येतो.
तो ‘जीना नही मुझे है मरना’ हे गाणे म्हणत येतो. नंतर तो या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाहून त्याची पत्नी सोहा जोरजोरात हसते. त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचा हा मजेशीर डान्स पाहून सर्वांना कदाचित त्याच्या गोलमाल या चित्रपटातून त्याचे विनोदी पात्र आठवले असेल. त्यामुळे सगळे हसण्याची ईमोजी पोस्ट करून त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहे.
कुणाल खेमूच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 1993 मध्ये ‘सर’ या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनतर त्याने ‘राजा हिंदुस्थानी’, ‘कलियुग’, ‘ढोल’, ‘गोलमाल 3’, ‘गो गोवा गॉन’, ‘गोलमाल अगेन’, ‘मलंग’, ‘लूटकेस’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याने 2015 साली सोहा अली खान सोबत लग्न केले. त्या दोघांना इनाया नावाची एक मुलगी आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ