Wednesday, July 30, 2025
Home बॉलीवूड भारताविराेधात बाेलले, म्हणून बॅन…आता बॅन हटला!

भारताविराेधात बाेलले, म्हणून बॅन…आता बॅन हटला!

पहलगाममधल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या काही सेलिब्रिटींची इंस्टाग्राम अकाउंट्स भारतात बंद (बॅन) केली गेली होती. पण आता काही कलाकारांची अकाउंटवरून हा बॅन हटवण्यात आला आहे, आणि ती अकाउंट्स भारतात पुन्हा पाहता येत आहेत.

भारत-पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर वातावरण तंग झालं होतं. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानच्या काही कलाकारांनी भारताबद्दल वाईट बोललं. त्यामुळे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सवर भारतात बंदी आली होती, म्हणजे भारतीय लोक त्यांची प्रोफाइल्स पाहू शकत नव्हते. पण आता दोन महिन्यांनी ही बंदी काही कलाकारांवरून हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात पुन्हा काही पाकिस्तानी सेलेब्सची इंस्टाग्राम अकाउंट्स दिसू लागली आहेत. यामध्ये ‘सनम तेरी कसम’ फेम मावरा होकन हिचं नावही आहे.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून कडक उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी कलाकार चांगलेच चिडले होते. त्यावेळी मावरा होकेन हिने भारताला भित्रा म्हणलं होतं. आता काही पाकिस्तानी कलाकारांची इंस्टाग्राम अकाउंट्स भारतात पुन्हा दिसायला लागली आहेत, पण अजूनही काहींच्या प्रोफाइल्स भारतात दिसत नाहीयेत. मावरा होकेनचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात दिसायला लागल्यामुळे तिचे फॅन्स खूपच खुश झालेत. लोक तिच्या पोस्टवर खूप कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं, “भारतात तुझं अकाउंट पुन्हा दिसतंय.” तर दुसऱ्याने म्हटलं, “शेवटी मावरा भारतात परत आली आहे. माझी आवडती सरु… मी तुला खूप मिस केलं!”

मावरा होकेन सोबतच आता लाइबा खान, सबा कमर, अली अंसारी, हिबा बुखारी, दानिश तैमूर, दानानीर मोबीन, अहद रजा मीर आणि युमना जैदी यांच्या इंस्टाग्रामवरची बंदी हटवली गेली आहे. म्हणजेच, आता या सगळ्या सेलेब्रिटींचे पोस्ट आता तुम्ही भारतातही इंस्टाग्रामवर पाहू शकता. पाकिस्तानमधले काही प्रसिद्ध कलाकार अजूनही भारतात बॅन आहेत. माहिरा खान, आतिफ असलम, फवाद खान आणि हानिया आमिर यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स अजून भारतात दिसत नाहीत.

‘सनम तेरी कसम’ ‘चित्रपटानंतर मावरा होकेन भारतात खूपच फेमस झाली होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी तिचं एक गाणंही आलं होतं, “तू चांद है”, जे अखिल सचदेवाने गायलेलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार प्रिमियर…

हे देखील वाचा