बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका निभावणारा हा अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचे जीव वाचवून त्यांच्यासाठी देवदूत बनला आहे. मागील एका वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकांचे जीव जात आहे. यात सोनू सूद त्याला जमेल तशी सर्वांना मदत करत आहे. त्याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी त्याने सूद फाउंडेशन सुरू केली आहे. त्याच्या या फाउंडेशनमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कर्ण शर्मा याने देखील मदत केली आहे. त्यामुळे सोनू सूदने त्याचे कौतुक केले आहे.
सोनू सूदने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कर्ण शर्माचे कौतुक केले आहे. कर्ण हा आयपीएलमध्ये महेंद्र सिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू आहे. कर्ण शर्माने केलेल्या मदतीसाठी सोनू सूदने त्याचे कौतुक केले आहे.
सोनू सूदने ट्वीट करून लिहिले की, “सोनू सूद फाउंडेशनला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भावा कर्ण शर्मा. तू पुन्हा एकदा देशातील तरुणांना प्रेरित केले आहे. तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवले आहे.”
Thank you so much brother @sharmakarn03 for your constant support to @SoodFoundation! You have inspired the youth of the nation once again and people like you truly make this world a beautiful and peaceful place. ????
— sonu sood (@SonuSood) May 18, 2021
सोनू सूदचे हे ट्वीट वाचून कर्ण शर्माने अभिनेत्याचे आभार मानले आहेत. सोनू सूदच्या ट्विटला उत्तर देत कर्णने लिहिले की, “तू आपल्या देशाचा खरा हिरो आहेस. तू खूप चांगला प्रयत्न करत आहेस. तुझ्या कामासाठी खूप शुभेच्छा. असंच काम करत राहा भावा.”
You are a real hero of our Nation. Doing a great effort. Hats-off to you! Keep going brother. ????????????
— Karn Sharma (@sharmakarn03) May 18, 2021
काही दिवसांपूर्वी सोनू सूदने भारत सरकारला विनंती केली होती की, कोरोनामुळे ज्यांच्या आई- वडिलांचे निधन झाले आहे, त्यांना मोफत शिक्षण द्या. समाजात जागरूकता पसरवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला आहे. सोनू सूदने 25 एप्रिलला एक टेलिग्राम ऍप लाँच केली आहे. ज्याच्या माध्यमातून तो देशभरातातील गरजू लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. शनिवारी त्याने ट्वीट करून संपूर्ण देशातील नागरिकांना सोनू सूद कोव्हिड फोर्स जॉईन करण्याची विनंती केली आहे. सोबतच त्याने लिहिले आहे की, “आता संपूर्ण देश सोबत येणार आहे. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन सगळ्यांना मदत करूयात, देशाला वाचवूयात.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ