अभिनेत्री अक्षरा सिंहने (Akshara Singh) आज सोमवारला एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये ती जीवन आणि सकारात्मक विचारांबद्दल बोलताना दिसते. भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती कायम आपल्या स्टायलिश फोटो शेअर करत असते आणि खासगी आयुष्यातील गोष्टीही सांगत असते. आज सोमवारच्या दिवशी तिने एक पोस्ट टाकली आहे आणि त्यासोबत थोडं गूढ असं कॅप्शनही लिहिलं आहे.
अक्षरा सिंहने आज सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. यात ती पारंपरिक लुकमध्ये, दुपट्टा झळकवत फोटोसाठी पोझ देताना दिसते. या फोटोसोबत तिने लिहिलंय “या जगात कठोर होणं सोपं आहे, पण वारंवार तुटल्यानंतरही मृदू मनाने जगणं हीच खरी ताकद आहे”. अक्षरा सिंहने तिच्या पोस्टसोबत लिहिलंय “इतरांसोबत दयाळूपणानं वागा”. तिच्या या पोस्टवर चाहते खूप छान प्रतिक्रिया देत आहेत. बर्याच जणांनी रेड हार्ट इमोजी टाकले आहेत.
अक्षराचा लुक आणि तिचं कॅप्शन दोन्हीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
एका युजरने लिहिलं “अक्षरा बहिण, अगदी खरं बोललीस!”. तर दुसऱ्याने म्हटलं “अक्षरा, आता तुला बॉलिवूडमध्ये जायलाच हवं!”. अभिनेत्री अक्षरा सिंहच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिचं नाव एकेकाळी भोजपुरी अभिनेता पवन सिंहसोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. दोघांनी एकत्र काही चित्रपटांतही काम केलं होतं. पण आता दोघं वेगळे झाले आहेत. त्यांचं ब्रेकअप खूप वाईट पद्धतीने झालं. अक्षराने पवन सिंहवर मारहाण आणि त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा