Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड ‘माझं तिथं अभिनवसोबत अफेयर झालं तर?’, म्हणत राखी सावंतने दिला ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये जाण्यास नकार

‘माझं तिथं अभिनवसोबत अफेयर झालं तर?’, म्हणत राखी सावंतने दिला ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये जाण्यास नकार

बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. तिने ‘बिग बॉस 14’ मध्ये तिने दाखवलेल्या जलव्यामुळे ती खूप चर्चेत आहे. राखी या शोमध्ये रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबत फ्लर्ट करायची त्यामुळे ती खूप चर्चेत होती. राखी सावंतने खुलासा केला आहे की, तिला ‘खतरों के खिलाडी 11’ या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर आली आहे. परंतु या शोमध्ये जाण्यासाठी तिचा मूड नाहीये. या शोमध्ये न जाण्याचे कारण तिने रुबीना दिलैक हे सांगितले आहे.

राखी सावंत नुकतीच काही दिवसांपूर्वी कॉफी पिण्यासाठी आली होती, तेव्हा तिला स्पॉट केले होते. दरम्यान तिने सांगितले की, तिला ‘खतरों के खिलाडी’ या शोची ऑफर आली आहे. तिने पुन्हा एका मस्तीच्या अंदाजात प्रेक्षकांना खुश केले आहे. वायरल भयानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राखीने दावा केला आहे की, ‘खतरों के खिलाडी’ हा शो अभिनव शुक्ला किंवा अर्जुन बिजलानी जिंकू शकतात.

राखीने सांगितले की, “मला खतरों के खिलाडी या शोची ऑफर आली आहे. मला माहित नाही मी जाईल की नाही. तसं तर हे साप, अजगर, किडे हे सगळे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मला तिकडे जायचं नाहीये कारण तिथे आता रुबीना‌ नाहीये ना. मग जर माझे तिथं अभिनवसोबत अफेअर झालं तर?? हो पण तिथे कबाब में हड्डी आहे ना ती तांबोली.”

राखीने पुढे सांगितले की, “त्या निकी तांबोळीचा डोळा अभिनववर आहे. अभिनव हा आधीपासूनच खूप चार्मिंग कूल आणि शानदार आहे.मजबूत आहे, चांगला मुलगा आहे. पण अभिनवच लग्न झालं आहे आणि मला लग्न झालेल्या लोकांनाकडे बघायला नाही आवडत. मला पाप नाही करायचं. तुम्ही मला पाप करायला नका लावू.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

-आलिया भट्टच्या लाईव्ह सेशनमध्ये दिसला रणबीर कपूरअन् तो पण विना शर्ट, एकदा पाहाच हा व्हिडिओ

हे देखील वाचा