Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड आंध्रप्रदेशमध्ये चक्क सोनू सूदच्या पोस्टरवर दुधाचा पाऊस! अभिनेत्यानेही दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

आंध्रप्रदेशमध्ये चक्क सोनू सूदच्या पोस्टरवर दुधाचा पाऊस! अभिनेत्यानेही दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिनेता सोनू सूद अनेकदा गरजू लोकांना मदत केल्यामुळे चर्चेत येत असतो. गेल्या वर्षी तो स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला होता, तर आज संपूर्ण देशभरात देवाप्रमाणे त्याची उपासना केली जात आहे. मजुरांना घरी पोहोचवायचे असो किंवा ऑक्सिजनची व्यवस्था करायची असो, एखाद्याला ट्रॅक्टर पाठवायचा असो किंवा कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई- वडिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे असो. या सर्वांसाठी एकच नाव समोर येते, ते म्हणजे सोनू सूद ज्याला लोकांचा मसीहा म्हटले जात आहे.

त्याचवेळी सोशल मीडिया वर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू सूदच्या पोस्टरवर दुधाचा पाऊस पाडला जात आहे. वास्तविक हा व्हिडिओ आंध्रप्रदेशमधील श्रीकलाहस्तीचा आहे, जिथे स्थानिक लोक ईश्वराप्रमाणे सोनू सूदच्या पोस्टरची पूजा करत आहेत आणि त्याला दूध चढवत आहेत.

सोनू सूदचा हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्याने लिहिले की, “हा त्याच्यासाठी सन्मानजनक आहे.” पुली श्रीकांत यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. याद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, अशा वेळी लोकांना मदत करणारा सोनू सूद देवापेक्षा कमी नाही. तो एक प्रेरणा स्त्रोत आहे.

सोनू सूद लोकांना अभ्यास, उपचार, काम, नोकरी आणि इतर प्रत्येक गोष्टीत मदत करताना दिसत आहे. सोनू सूदच्या मदतीमुळे, काही ठिकाणी गावात त्याची मूर्ती बनविली जातेय, तर इतरत्र त्याची पूजा केली जात आहे. त्याने आपल्या कार्याद्वारे बरीच मने जिंकली आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोनू सूदने लोकांना प्रत्येक बाबतीत खूप मदत केली होती. त्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विमानामार्फत भारतात आणले होते.

अभिनेता सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नुकताच ‘किसान’ हा चित्रपट साईन केला आहे. याशिवाय लवकरच तो ‘पृथ्वीराज’मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा