बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. टीव्हीपासून दूर आरतीची जलवा आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याशिवाय आरती सतत तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. अलीकडेच ती बिकिनी परिधान करून जेट स्कीवर पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसली. परंतु हे फोटो काही सोशल मीडिया युजर्सला आवडले नाहीत आणि त्यांनी या अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली.
आरती सिंगने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील काही अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आरती सिंग वॉटर जेट स्कीवर उभी राहून पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु ती जेटवर तिचे संतुलन व्यवस्थित ठेवू शकली नाही आणि ती तिच्या मिशनमध्ये अयशस्वी झाली.
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे, “मी पोझ देण्याचा प्रयत्न केला आणि मग मी हार मानली.” आरती सिंगचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी बरेच संतापलेले दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “वाटले नव्हते तू अशी होशील.” त्याच वेळी, दुसर्या युजरने लिहिले, “हे काय नाटक आहे.”
आरती सिंग प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसली होती. या शोद्वारे तिने बरीच लोकप्रियता मिळवली. या शोमध्ये आरतीने तिचे आयुष्य, पालक आणि भाऊ यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल अनेक खुलासे केलेले पाहायला मिळाले. तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘थोडा है थोडे की जरूरत है’ आणि ‘वारिस’ या मालिकांमध्ये दिसली आहे. ‘कॉमेडी क्लास’ या शोमध्येही तिने काम केले आहे. याशिवाय ती इतर काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये देखील दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच
-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक