Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड गुड न्यूज.! प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल बनली आई; मुलगा की मुलगी? आनंदाची बातमी सांगताना भावुक झाली श्रेया

गुड न्यूज.! प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल बनली आई; मुलगा की मुलगी? आनंदाची बातमी सांगताना भावुक झाली श्रेया

बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका श्रेया घोषाल आई बनली आहे. तिने शनिवारी (२२ मे) गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाने ही आनंदाची बातमी स्वत: आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

श्रेयाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “देवाने आज दुपारी एका अनमोल मुलाचा आशीर्वाद दिला आहे. ही खूपच भावुक करणारी भावना आहे. असे यापूर्वी कधीही जाणवले नव्हते. शिलादित्य आणि मी आमच्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा करत आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद.”

श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारही शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी गायिकेला स्वत:ची आणि मुलाची काळजी घेण्यासही सांगितली आहे.

अगोदरच ठेवले होते मुलाचे नाव
श्रेयाने जेव्हा आपल्या गरोदरपणाची बातमी दिली होती, तेव्हाच तिने मुलाचे नावही सांगितले होते. श्रेयाने फोटो शेअर करत लिहिले होते की, “बेबी श्रेयादित्य आपल्या मार्गावर आहे. शिलादित्य आणि मी तुम्हा सर्वांना ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी उत्साही आहोत. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. कारण आम्ही आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायासाठी स्वत: ला तयार करत आहोत.”

श्रेयाने शिलादित्यसोबत सन २०१५ मध्ये बंगाली रीतिरिवाजानुसार लग्न केले होते. दोघेही १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. श्रेया आपल्या लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती.

श्रेयाने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल २०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तिचे अधिकतर गाणी सुपरहिट राहिली आहेत.

श्रेयाला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. तिने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. श्रेयाने एकदा नव्हे, तर दोन वेळा सिंगिंग रियॅलिटी शो ‘सारेगामापा’मध्ये भाग घेतला होता. या शोमधून तिला आपल्या कारकिर्दीतील पहिले गाणे मिळाले होते. पहिल्यांदा श्रेया जेव्हा शोमध्ये आली होती, तेव्हा शो सोनू निगम होस्ट करत होता आणि परीक्षक म्हणून कल्याणजी होते. संगीतकार कल्याणजी यांच्या सांगण्यावरून श्रेयाच्या आई- वडिलांनी तिला मुंबईला आणले होते. तिथे तिने १८ महिन्यांमध्ये संगीत शिकले होते आणि पुन्हा ‘सारेगामापा’मध्ये भाग घेतला होता.

संजय लीला भन्साळींनी दिली होती पहिली संधी
जेव्हा श्रेयाने ‘सारेगामापा’मध्ये दुसऱ्यांदा भाग घेतला होता, तेव्हा तिचा परफॉर्मन्स दिग्दर्शक- निर्माते संजय लीला भन्साळींनी पाहिला होता. संजय यांची आईही हा शो पाहायची. त्यांच्या आईच्या शिफारसीमुळे संजय यांनी श्रेयाला गाण्यासाठी बोलावले होते. तिने ‘देवदास’ चित्रपटातील ‘बैरी पिया’ हे गाणे गाण्याची संधी दिली होती. या चित्रपटात श्रेयाने इस्माइल दरबारच्या दिग्दर्शनाखाली पाच गाणी गायली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा