Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड ‘तौक्ते’ वादळाने नष्ट केला अजय देवगणच्या ‘मैदान’चा आख्खा सेट; आता निर्माते बोनी कपूर ‘इतके’ कोटी करणार खर्च

‘तौक्ते’ वादळाने नष्ट केला अजय देवगणच्या ‘मैदान’चा आख्खा सेट; आता निर्माते बोनी कपूर ‘इतके’ कोटी करणार खर्च

एकीकडे देश कोरोना महामारीच्या विरूद्ध लढा देत आहे. दुसरीकडे, नुकतेच येऊन गेलेल्या तौक्ते वादळाने बरेच नुकसान केले आहे. मुंबईच्या बर्‍याच भागात या वादळाचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. त्याचबरोबर बर्‍याच मोठमोठ्या चित्रपटांच्या सेट्सलाही या वादळाचा चांगलाच फटका बसला. त्यातील एक सेट अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटाचा होता. या वादळामुळे ‘मैदान’चा सेट पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही कोव्हिडमुळे लॉकडाऊनमध्ये हा सेट मोडण्यात आला होता.

‘लॉकडाऊन नसते लागले, तर शूट पूर्ण झाले असते’
या विषयावर बोलताना चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर म्हणाले की, “सेट पूर्णपणे खराब झाला आहे. आता मी तिसऱ्यांदा तो बनवणार आहे. जर आता हे लॉकडाऊन नसते, तर आम्ही आत्तापर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असते. परंतु कोरोनाने सर्व काही खराब केले आहे.”

‘हा चित्रपट थिएटरसाठी बनला आहे’
सांगण्यात येत आहे की, हा सेट तब्बल २२ कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. तसेच आता सेट पुन्हा तयार करण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपये खर्च करावे लागतील. असे सांगितले जात आहे की, खेळपट्टी वगळता संपूर्ण सेट नष्ट झाला आहे. तसेच, खेळपट्टीचे देखील थोडेफार नुकसान झाले आहे, परंतु ते दुरुस्त केले जाऊ शकते. त्याचवेळी, बोनी कपूर यांनी सांगितले आहे की, त्यांचा हा चित्रपट चित्रपटगृहांसाठी आहे आणि ते याला फक्त चित्रपटगृहांमध्येच रिलीझ करणार आहेत.

फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत अजय देवगण
अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण एका फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त यात प्रियमणि, गजराज राव आणि रुद्रानील घोष काम करताना दिसणार आहेत. बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता निर्मित हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतही रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

हे देखील वाचा