Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘वरात घेऊन कधी येशील?’ म्हणत ‘शालू’ने केला व्हिडिओ शेअर; तर चाहत्यांच्या भन्नाट कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ मधील ‘शालू’ अर्थातच राजेश्वरी खरात आजकाल खूपच लाईमलाईटमध्ये राहते. चित्रपटामुळे नव्हे, तर ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते. तिचे फोटो व व्हिडिओ दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तसेच नेटकरीही तिच्या पोस्टवर बऱ्याच मजेदार प्रतिक्रिया देताना दिसतात. राजेश्वरीचा असाच एक व्हिडिओ पुन्हा जोरदार व्हायरल होत आहे.

राजेश्वरीने सोशल मीडियावर तिचा एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गोविंदाच्या ‘क्यों की मैं झूठ नही बोलता’ या चित्रपटातील ‘पा लिया है प्यार तेरा’ गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. या गाण्यावरील तिचे एक्सप्रेशन्स पाहून, चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत.

व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारले आहे की, “तुम्हाला माझी स्माईल आवडली का?” तिचा हा व्हिडिओ सतत पाहिला जात आहे. चाहत्यांनी नेहमीप्रमाणे या पोस्टलाही खूप प्रेम दिले आहे. यावर नेटकऱ्यांकडून अक्षरशः लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला जातोय. नेहमीप्रमाणेच या व्हिडिओवरही मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

खरंतर या व्हिडिओमध्ये, राजेश्वरी म्हणत आहे की, “वरात घेऊन कधी येशील सांग ना!’ यावर एका युजरने मजेदार कमेंट केली आहे. विशेष म्हणजे, राजेश्वरीने या कमेंटला उत्तरही दिले आहे. युजरने आपल्या कमेंटमध्ये लिहिले की, “वाटेत आलोय, चेकपोस्टवर पोलिसांनी अडवलंय.” यावर प्रतिक्रिया देत शालूने लिहिले, “पावती शिवाय येऊ नका!” व्हिडिओ सोबतच या कमेंटनेही अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय आणखी एका युजरने लिहिले की, “मोदीपेक्षा तू फेमस झालीस. पोस्ट पडते न पडते तोच लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस सुरू होतोय.” याला उत्तर देत राजेश्वरीने हसण्याचे ईमोजी पोस्ट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

हे देखील वाचा