भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज भारतातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. या दिवसात अनुष्का शर्माचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात करण जोहर क्रिकेटच्या विनोदावर अभिनेत्रीची टिंगल उडवताना दिसला आहे. हा व्हिडिओ २०१८ चा आहे, जेव्हा अनुष्का तिच्या ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘इंडियाज गॉट टॅलेंट ८’ च्या सेटवर आली होती. त्यावेळी तिच्यासोबत कॅटरिना कैफ देखील सामील झाली होती.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये करण जोहर दोन्ही अभिनेत्रींना विचारतो की, ‘बहकी है निगाहे और बिखरे है बाल’ हे कोणत्या चित्रपटाचे गाणे आहे? अनुष्का याचे चुकीचे उत्तर देते आणि म्हणते की, हे गाणे ‘कोई मिल गया’ चित्रपटाचे आहे, तर कॅटरिना योग्य उत्तर देते आणि ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट सांगते.
करण पुढचा प्रश्न विचारतो तेव्हा अनुष्का कॅटरिनाने उत्तर देण्याच्या अगोदरच गाणे गाण्यास सुरुवात करते. यावर तक्रार करत कॅटरिना म्हणते की, “मला संधीच नाही मिळाली.” यावर अनुष्का म्हणते, “मैने मौके पे चौका मार दिया.”
करण जोहर अनुष्काच्या तोंडून ‘चौका’ हा शब्द ऐकताच, मग काय! लगेचच त्याने अभिनेत्रीची टिंगल उडवण्यास सुरुवात केली. करण म्हणतो, “इतकी मोठी झाली आहे माझी मुलगी, क्रिकेटवर जोक्स क्रॅक करू लागली आहे. असो, तू तर देशाची सून आहेस, आम्ही त्यात काहीही बोलू शकत नाही.” यावर अभिनेत्री हसू लागते.
बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, विराट कोहलीने ११ डिसेंबर, २०१७ रोजी, इटलीच्या टस्कनी येथील आलिशान रिसॉर्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत गुप्तपणे लग्न केले. दुसरीकडे ११ जानेवारी, २०२१ रोजी विराट आणि अनुष्का एका गोंडस मुलीचे पालक बनले आहेत. विराट- अनुष्काने त्यांचा मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’
-‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य
-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम