Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड उशिरा सोडा, काही लोक तर सेटवर येतच नाहीत; इमरान हाश्मीचा नक्की कोणाला टोमणा?

उशिरा सोडा, काही लोक तर सेटवर येतच नाहीत; इमरान हाश्मीचा नक्की कोणाला टोमणा?

अभिनेता इमरान हाश्मी लवकरच “हक” चित्रपटात दिसणार आहे. यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा आहे. इमरानने यामी गौतमसोबत काम करण्याचा अनुभव तसेच वेळेवर न येणाऱ्या कलाकारांबद्दल चर्चा केली.

द हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना इमरान हाश्मी म्हणाला, “यामी गौतम ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी वेळेवर येते. माझ्यासारखीच, त्यामुळे कोणतीही समस्या नव्हती. काही लोक तर येतच नाहीत. ते सरळ शूट रद्द करतात.” इमरान पुढे म्हणाला, “मला अशा लोकांसोबत काम करायचे आहे ज्यांच्यासोबत मला ही प्रक्रिया आवडते. जिथे तुम्हाला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. हि गोष्ट तुमची ऊर्जा कमी करते. तुम्ही दुसऱ्याच्या घड्याळाप्रमाणे काम करता.”

निर्मात्यांनी अलीकडेच “हक” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला. इमरान चित्रपटात यामी गौतमच्या पतीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले आहे. वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका आहेत. पटकथा आणि संवाद रेशु नाथ यांनी लिहिले आहेत. विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

द फॅमिली मॅनचा तिसरा झाला जाहीर; नोव्हेंबरच्या या तारखेला प्रदर्शित होतेय मालिका…

हे देखील वाचा