Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सनी देओलच्या मुलाने सावत्र आजी हेमा मालिनीचे पाहिलेत जेमतेम एक-दोन सिनेमे, म्हणतोय…

देओल कुटुंब त्यांच्या परस्पर संबंधांमुळे बर्‍याचदा चर्चेत राहते. सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओलचे म्हणणे आहे की, त्याने हेमा मालिनी यांचे फक्त एक- दोन चित्रपट पाहिले आहेत, पण इतक्याच चित्रपटांच्या आधारे त्याला समजले की, हेमा मालिनी या ‘उत्तम अभिनेत्री’ आहेत. करण देओलने हेमा मालिनींच्या बॉलिवूड कारकिर्दीला ‘महान’ देखील म्हटले आहे. नुकत्याच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत करण देओलने हेमा यांच्याबद्दल आपले मत मांडले.

करण हा सनी देओलचा मोठा मुलगा आहे. त्याने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता तो फॅमिली बॅनरचा चित्रपट ‘यमला पगला दिवाना’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा करणला हेमा मालिनीबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाले की, “पहिल्या चित्रपटापासून ते शेवटच्या चित्रपटापर्यंत त्यांची कारकीर्द उत्कृष्ट आणि सन्माननीय राहिली आहे.” त्याचवेळी करणला विचारले गेले की त्यांनी हेमा मालिनीचे चित्रपट पाहिले आहेत का?, तर करणने उत्तर दिले, “हो, मी त्यांचे एक-दोन चित्रपट पाहिले आहेत. त्यांची कारकीर्द उत्तम होती आणि मी जे पाहिले आहे ते पाहून मी म्हणू शकतो की, त्या एक चांगल्या अभिनेत्री आहेत.”

हेमा मालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बागबान’ असे अनेक हिट चित्रपट केले आहेत.

करण हा धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा सीन देओलचा मुलगा आहे. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी दुसरे लग्न केले होते, तर त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा