Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हे काय केले भाभी जी?’, दिशा परमारचा मेकअप पाहून युजर्सनी केले ट्रोल

बॉलिवूड कलाकार असो किंवा टीव्ही कलाकार सध्या प्रत्येकजण सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ खर्च करताना दिसत आहेत. आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करून ते चर्चेत येत आहेत. परंतु काहीवेळा त्यांना आपल्या पोस्टमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असेच काहीसे झाले आहे. टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसोबत. दिशा सध्या सोशल मीडियामार्फत चाहत्यांचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. परंतु कदाचित तिच्या चाहत्यांना तिचे फोटो आवडले नाहीत आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

झालं असं की, दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने गुलाबी रंगाची आयशॅडो लावलेली दिसत आहे. परंतु ते खूपच गडद दिसत असल्यामुळे ट्रोलर्सनी तिला मेकअपचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहिले आहे की, “भाभी जी हे काय केले?” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “राहुल वैद्यचे लक्ष वेधण्यासाठी आणखी काय- काय करशील?” याव्यतिरिक्त दुसऱ्या युजरे लिहिले की, “खूप वाईट वाटत आहे.” दिशाने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करण्यापूर्वी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओलाही अनेक युजर्सची पसंती मिळाली नव्हती.

खरं तर, यापूर्वी ‘बिग बॉस १४’शोचा उपविजेता राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. या शोदरम्यान राहुलने दिशाला रोमँटिक अंदाजात लग्नासाठी प्रपोज केला होता. व्हॅलेंटाईन आठवड्यादरम्यान दिशाने घरातील सर्वांसमोर होकार दिला होता. यानंतर राहुल आणि दिशाचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. तरीही राहुलने अनेकवेळा सांगितले आहे की, ते लवकरच लग्न करणार आहेत.

हे देखील वाचा