बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)हिने फिल्म इंडस्ट्रीतील पेड प्रमोशन, जबरदस्तीने सकारात्मक समीक्षा करवून घेणे आणि नेगेटिव सिंडिकेट यांसारख्या वाढत्या गैरव्यवहारांविरोधात थेट आवाज उठवला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यामीने एक लांबलचक पोस्ट लिहीत या अनैतिक व्यवहारांमुळे संपूर्ण उद्योग आणि क्रिएटिविटी धोक्यात जात असल्याचे नमूद केले.
यामीने स्पष्ट केले की, आजच्या घडीला काही लोक फिल्मची स्तुती करण्यासाठी पैसे मागतात. जर पैसे दिले नाहीत तर ते सतत नकारात्मक प्रचार करून फिल्मची प्रतिमा खराब करतात. हा प्रकार अत्यंत हानिकारक आहे.असे म्हणत तिने या संस्कृतीला आळा घालण्याचे आवाहन केले. तिच्या मते, अशा पेड रिव्ह्यू आणि नेगेटिव कॅम्पेनमुळे निर्माते व कलाकारांचा आत्मविश्वास डळमळतो आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे.
यामीने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे उदाहरण देत म्हटले की तिथे सर्वजण एकजूट आहेत, त्यामुळे अशा गैरव्यवहारांना वाढण्यास वाव मिळत नाही. बॉलिवूडमध्येही अशीच एकजूट निर्माण होणे गरजेचे असल्याचे तिने सांगितले.
यामीने ही मते एका इंडस्ट्री सदस्य म्हणून नाही तर एका ईमानदार निर्मात्याची पत्नी म्हणून – (तिचे पती आणि ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर)-व्यक्त केली. प्रेक्षकांनी पैसे दिल्यावर मिळणार्या बनावट स्तुतींवर विश्वास न ठेवता स्वतःचा निर्णय महत्त्वाचा ठेवा, असे आवाहनही तिने केले.
यामीच्या या ठाम भूमिकेला ऋतिक रोशननेही जोरदार पाठिंबा दिला आहे. यामीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना ऋतिक म्हणाला, हे सुरू राहिले तर सर्वात मोठे नुकसान या उद्योगाचे होईल. अशा गोष्टींमुळे क्रिएटिविटी आणि ग्रोथ थांबते.सध्या यामीचा पोस्ट संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरला असून अनेक कलाकार तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अवतार: फायर एंड एश’’ प्रदर्शनाआधीच सोशल मीडियावर धुमाकूळ; पेंडोरा आणि एश लेडीवर फॅन्स झाले फिदा


