भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालिसाचे नाव सगळ्यात टॉपला असते. मोनालिसा तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे. तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दिवाने आहेत. पण त्यासोबत ती चर्चेत असते, तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने बॅकलेस ड्रेस घातला आहे. तिने हे फोटोशूट एका गार्डनमध्ये केलेले दिसत आहे. नेहमी प्रमाणेच तिच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तिचे चाहते तर तिचा हा बोल्ड अंदाज पाहून नेहमीच तिच्याकडे आकर्षित होत असतात.
आता देखील ते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री रशमी देसाई हिनेही ‘उफ्फ’ अशी कमेंट केली आहे. याव्यतिरिक्त हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊसही चाहत्यांनी पाडला आहे. मोनालिसाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावू शकतो की, तिचे इंस्टाग्रामवर ४.३ मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत.
मोनालिसाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ती सुरळीतपणे बाहेर पडली आहे. याआधी ती तिचे वजन कमी झाल्याकारणाने देखील चर्चेत आली होती, तेव्हा सगळेजण तिला तिचे वजन कमी झाल्यामागचे कारण विचारत होते. मोनालिसा ही ‘बिग बॉस १०’ ची स्पर्धक होती. यावेळी तिने तिच्या बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती. तिने ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










