Monday, December 22, 2025
Home अन्य स्मृती मंधाना–पलाश मुच्छल नात्यात ताण? दोघांनीही इंस्टाग्रामवरून हटवले पोस्ट, चर्चेला उधाण

स्मृती मंधाना–पलाश मुच्छल नात्यात ताण? दोघांनीही इंस्टाग्रामवरून हटवले पोस्ट, चर्चेला उधाण

क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि सिंगर–कंपोजर पलाश मुच्छल (Palash Muchhal)यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चा सुरू आहेत. त्यांच्या लग्नाबाबत अनेक अटकळी रंगल्यानंतर आता त्यांचे नाते तुटल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की दोघे लवकरच विवाहबद्ध होणार होते, मात्र त्या बातम्या खोट्या ठरवणारी नवी घडामोड घडली आहे. दोन्ही कलाकारांनी स्वतःच्या सोशल मीडियावर केलेल्या बदलांमुळे ‘नातं तुटलं का?’ असा प्रश्न जोरात उपस्थित होत आहे.

पूर्वी अशी माहिती समोर आली होती की स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. त्याच दरम्यान पलाश मुच्छल हे देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याची बातमी समोर आली होती. सध्या दोघेही पूर्णपणे ठीक आहेत. मात्र, या सर्वांच्या दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे स्मृती आणि पलाश यांची इंस्टाग्राम प्रोफाइल्स.

स्मृती मंधाना यांनी अचानक आपल्या इंस्टाग्राम बायोमधून पलाशशी संबंधित ओळख हटवली आहे. एवढेच नाही, तर पलाशसोबतचे जवळजवळ सर्वच फोटो, खास क्षणांचे व्हिडिओ, सगाईचा अंदाज व्यक्त करणारे पोस्ट -हे सर्व तिने प्रोफाइलवरून काढून टाकले आहे. यापूर्वी तिने लग्नाचा संकेत देणारा व्हिडिओ डिलीट केल्याचेही समोर आले होते.

दुसरीकडे, पलाश मुच्छल यांनी देखील अनेक पोस्ट हटवल्या आहेत. स्मृतीला स्टेडियममध्ये केलेले प्रपोजल, तिला समर्पित केलेले विशेष पोस्ट, अगदी तिच्यासाठी केलेला टॅटू दाखवणारा फोटो — असे अनेक पोस्ट आता त्यांच्या प्रोफाइलवरून गायब झाले आहेत. तरीही पलाशच्या अकाऊंटवर स्मृतीसोबतचे काही फोटो अद्याप दिसत असल्याचे लक्षात येते, परंतु स्मृतीच्या प्रोफाइलवरून पलाशशी संबंधित सर्वच आठवणी हटवण्यात आल्या आहेत.दोघांनी नात्याबाबत अधिकृतपणे काहीही वक्तव्य केलेले नाही. मात्र, इंस्टाग्रामवरील या हालचालींमुळे त्यांच्या नात्यात खरोखरच दुरावा आला आहे का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

बिग बॉस 19’चा मानकरी गौरव खन्ना; विजेतेपदासोबत मिळाली लाखोंची रक्कम आणि चमचमीत ट्रॉफी

हे देखील वाचा