राजकारणात भिन्न मतं, वेगवेगळे विचारधारे आणि सततचा कलह पाहण्याची सर्वांची सवय झाली आहे. मात्र, क्वचितच असा प्रसंग येतो जेव्हा विरोधी पक्षांचे नेते सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात—तेही आनंदाच्या क्षणी! असा दुर्मीळ नजारा उद्योगपती आणि राजकारणी नवीन जिंदल यांच्या मुलगी यशस्विनी जिंदल यांच्या लग्नाच्या संगीत समारंभात पाहायला मिळाला.
दिल्लीतील जिंदल निवासात झालेल्या या साजिर्या सोहळ्यात कंगना रनौत, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि एनसीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच मंचावर येत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘दीवानी-दीवानी’ वर दिलखुलास नृत्य सादर केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिघींचा उत्साह, लयबद्ध स्टेप्स आणि मोकळेपणाने केलेला परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक भारावून गेले. परफॉर्मन्स दरम्यान स्वतः नवीन जिंदल देखील स्टेजवर सहभागी झाले आणि पाहुण्यांसोबत या रंगतदार संध्याकाळीचा आनंद लुटला. कंगना रनौत (Kanagana ranaut)यांनीही डान्स रिहर्सल करतानाचे फोटो याआधीच शेअर केले होते. त्यांनी मजेदार कॅप्शन देत लिहिले, साथी कलाकारांसोबत काही फिल्मी क्षण… नवीन जिंदल यांच्या मुलीच्या संगीतासाठी रिहर्सल करताना खूप मजा आली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया वाढल्या. काहींनी हेच लोकांचा एकत्रित चेहरा आहे, अशा टीका केल्या तर अनेकांनी राजकीय मतभेद वैचारिक असावेत, वैयक्तिक नव्हे. हा प्रसंग सर्वसामान्यांनी शिकण्यासारखा आहे, असे लिहिले.
यशस्विनी जिंदल आणि शाश्वत सोमाणी यांच्या लग्न सोहळ्याला राजकीय, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली. समारंभातील सर्वात खास क्षणांपैकी एक म्हणजे जिंदल कुटुंबातील रतन, पृथ्वीराज, सज्जन आणि नवीन जिंदल यांनी दलेर मेहंदी यांच्या ‘ना ना ना रे’ या सुपरहिट गाण्यावर दिलेला धमाल परफॉर्मन्स. सज्जन जिंदल यांच्या पत्नी संगीताने हा व्हिडिओ शेअर करत “सर्व देवरांना एकत्र नाचताना पाहून भावूक झाले, असे लिहिले.
जिंदल कुटुंब भारतातील सर्वात प्रभावशाली व संपन्न घराण्यांपैकी एक. जिंदल स्टील अँड पॉवरचे चेअरमन असलेले नवीन जिंदल हे सर्वांत धाकटे. 2004 मध्ये काँग्रेस खासदार म्हणून राजकारणात प्रवेश केलेल्या जिंदल यांनी 2024 मध्ये बीजेपीमध्ये प्रवेश केला. फोर्ब्सनुसार कुटुंबाची एकूण संपत्ती 36 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे मानले जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
स्मृती मंधाना–पलाश मुच्छल नात्यात ताण? दोघांनीही इंस्टाग्रामवरून हटवले पोस्ट, चर्चेला उधाण










