Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: कोरोना काळातील ‘देवदूत’ सोनू सूदला बांधली महिलेने राखी; पाया पडू लागताच अभिनेता म्हणाला…

व्हिडिओ: कोरोना काळातील ‘देवदूत’ सोनू सूदला बांधली महिलेने राखी; पाया पडू लागताच अभिनेता म्हणाला…

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणजे सोनू सूद. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका निभावणार हा अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचे जीव वाचवून त्यांच्यासाठी ‘देवदूत’ बनला आहे. मागील एका वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकांचे जीव जात आहे. यात सोनू सूद त्याला जमेल तशी सर्वांना मदत करत आहे. त्याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी सूद फाऊंडेशन चालू केले आहे. तसेच त्याच्या टीमने समाज सेवेसाठी एक टेलिग्राम ऍप लॉन्च केले आहे. या कोरोना काळात जेव्हा वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडत आहे तेव्हा सोनू सूदने स्वतः पुढाकार घेऊन अनेक नागरिकांना मदत केली आहे.

सोनू सूदचे चाहते तर तर त्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक करत आहेत. मागील एक वर्षापासून तो नागरिकांची मदत करत आहे. मागच्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनमध्ये देखील त्याने अनेक प्रवासी मजुरांना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. यातच अनेकजण घराच्या बाहेर जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक महिला सोनू सूदला भेटायला गेली. तिने त्याला राखी देखील बांधली. एवढचं नाही, तर ती त्याच्या पाया पडत होती.

त्यावेळी सोनूने तिला थांबवले आणि म्हणाला, “नाही नाही तुम्ही असं नका करू.” फोटोग्राफर मानव मंगलने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनू सूदने या आधी देखील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले होते की, “दिल्लीमधून सर्वात जात कोरोना केस समोर येत आहेत
दिल्लीमधील मृतांची संख्या देखील तुलनेने जास्त आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीसाठी एक नंबर देत आहोत. ज्याद्वारे येथील लोक आम्हाला संपर्क करू शकतात. आम्ही लगेच त्यांच्या घरी ऑक्सिजन कंसंट्रेटर त्यांच्या घरी पोहोचवू शकतो. ही सेवा मोफत असणार आहे. जेव्हा या ऑक्सिजन कंसंट्रेटरची गरज पूर्ण होईल, तेव्हा मात्र कृपया तुम्ही हे आम्हाला परत द्या. त्याचा वापर इतर कोणाला होऊ शकतो. गरजूंसाठी मी नेहमीच उभा आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा