Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बेटा तू…’, जेव्हा सुपरस्टार अक्षय कुमारने दिला होता रणवीर सिंगला पैसे कमावण्याचा लाखमोलाचा सल्ला

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आज तो बॉलिवूडमधील सर्वात बिझी आणि टॉपचा अभिनेता आहे. त्यामुळे तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप जास्त फी घेत असतो. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. तरी देखील बॉलिवूड मधील खिलाडी अक्षय कुमारने एकदा त्याला पैसे कमावण्याचा एक सल्ला दिला होता. या गोष्टीचा खुलासा स्वतः रणवीर सिंगने त्याच्या एका मुलाखतीत केला होता.

खरं तर हो गोष्टी तेव्हाची आहे जेव्हा रणवीर सिंग याने त्याच्या चित्रपटातील करिअरला सुरुवात केली नव्हती. काही वर्षापूर्वी रणवीर सिंगने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, अक्षय कुमारने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याला खूप पैसे कमावण्याच्या सल्ला दिला होता. रणवीर सिंगने सांगितले की, “त्याच्या करिअरच्या सुरुवातीला एका लग्नात डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी गेला होता. तिथे बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ हे त्यांचा डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी आले होते.”

रणवीर सिंगने संगितले की, “जेव्हा हा कार्यक्रम संपला, तेव्हा आम्ही सगळे बॅक स्टेजला गेलो. त्यावेळी लग्नाचा सिझन चालू होता.‌ अक्षय सरांना पुढच्या आठवड्यात देखील एका लग्नात परफॉर्मन्स द्यायचा होता, तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘बेटा तू पुढच्या आठवड्यात येणार आहे का?’ तेव्हा मी म्हणालो, ‘नाही सर मला पुढच्या आठवड्यात जरा काम आहे.’ माझे हे उत्तर ऐकून अक्षय सर मला म्हणाले की, ‘मी पैसे वाया गेलेले पाहू शकत नाही, माझ्याकडे बघ, लग्न असले की मी नाचतो, वाढदिवस असो मी नाचतो, कोणाचं मुंडण असो की नाचतो, एखाद लहान मूल रडत असलं तरीही मी नाचतो.'”

अक्षय कुमारला रणवीर सिंग हा खूप आवडतो. त्याने एकदा त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याला रणवीर सिंगमध्ये त्याची प्रतिमा दिसते. आज हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. दोघांनी ही त्याचे नाव कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा