Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड गुगल ट्रेंड्स 2025; ‘वॉर 2’ आणि ‘कांतारा’ला मागे टाकत या सुपरहिट चित्रपटाने मारली बाजी

गुगल ट्रेंड्स 2025; ‘वॉर 2’ आणि ‘कांतारा’ला मागे टाकत या सुपरहिट चित्रपटाने मारली बाजी

सिनेमागृहांत या वर्षी अनेक मोठ्या बजेटच्या आणि सुपरस्टार्सच्या चित्रपटांची प्रदर्शने झाली. काही चित्रपटांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले, तर काही मोठ्या नावांच्या फिल्म्स अपेक्षेनुसार प्रभाव पाडू शकल्या नाहीत. वर्ष 2025 काही दिवसांनी  सरेल आणि त्याच दरम्यान गुगलने भारताच्या सर्वाधिक सर्च झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. रितिक रोशन– (Hrithik Roshan)ज्युनियर एनटीआर यांची ‘वॉर 2’ असो किंवा रजनीकांत यांचा ‘कुली’, प्रेक्षकांच्या अपेक्षेचा भडिमार असलेल्या या चित्रपटांना गुगल सर्चमध्ये मात्र पहिल्या क्रमांकाची जागा मिळाली नाही.

गुगलनुसार 2025 मध्ये भारतात सर्वाधिक शोधली गेलेली फिल्म म्हणजे मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’. हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. अहान पांडे यांच्या अभिनय पदार्पणाची ही फिल्म आणि अनिता पड्डा यांचा तिसरा अभिनय प्रकल्प प्रेक्षकांना प्रचंड भावला. कथा, संगीत, कलाकारांचा अभिनय—सगळ्याच बाबतीत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आणि गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी फिल्म ठरली.

पहिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रिषभ शेट्टी यांचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ हा चित्रपट राहिला. 2022 मध्ये आलेल्या पहिल्या भागानंतर दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दमदार व्हिज्युअल्स, लोककथेची रंजक मांडणी आणि रहस्यपूर्ण कथानकाने हा चित्रपट वर्षभर चर्चेत राहिला.

तिसरा क्रमांक मिळाला तो रजनीकांत यांच्या ‘कुली’ला.तर रजनीकांतसोबत नागार्जुन, आमिर खान, श्रुती हासन आणि शौबिन शाहीर यांच्या उपस्थितीमुळे फिल्म प्रदर्शानंतरच चर्चेत आली.

चौथ्या क्रमांकावर यशराज फिल्म्सचा ‘वॉर 2’, तर पाचव्या क्रमांकावर 2016 चा रोमँटिक ड्रामा ‘सनम तेरी कसम’ री-रिलीज झाल्यानंतर सुपरहिट ठरला आणि पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला.गुगल सर्चच्या टॉप 10मध्ये पुढील चित्रपटांनीही स्थान मिळवले— मार्को,हाउसफुल 5,गेम चेंजर,मिसेस,महावतार नरसिंहा आणि गुगलच्या या लिस्टनं एक गोष्ट स्पष्ट केली—प्रेक्षकांना फक्त सुपरस्टार्स नव्हे, तर दमदार कथा, ताजे चेहरे आणि नॉस्टॅल्जिक सिनेमांचा अनुभव अधिक भावतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

44 वर्षांचे असताना अभिनेता बनलेला पूर्वीचा नमकीन विक्रेता; 22 वर्षांनी इंडस्ट्रीतून ब्रेकची चाहूल? म्हणतो- ‘थकलो आहे’

हे देखील वाचा