बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः रॅपर फ्लिपेराची यांच्या फा9ला या गाण्यावर आधारित त्याची भव्य एन्ट्री सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्याची स्टाईल, स्क्रीन प्रेझेन्स आणि नृत्याची अनोखी एनर्जी अक्षरशः भुरळ घालत आहे.
दरम्यान, अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor)खानची एक जुनी मुलाखत पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. 2004 मध्ये हलचलच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या या मुलाखतीत करीनाने सांगितले होते की ती शालेय जीवनात अक्षय खन्नाची प्रचंड फॅन होती. तिने हिमालय पुत्र हा त्याचा पहिला चित्रपट किमान 20 वेळा पाहिल्याचेही नमूद केले होते. करीना म्हणाली होती, “त्या काळात अक्षय खन्ना हा सर्व मुलींचा हार्टथ्रोब होता. आम्ही सगळ्या त्याच्यावर फिदा होतो.” तिने अक्षयला “गोड, सभ्य आणि हॉलिवूडसाठी परफेक्ट अभिनेता” अशीही प्रशंसा दिली होती.
प्रियदर्शन दिग्दर्शित हलचल हा 1991 च्या मल्याळम चित्रपट द गॉडफादरचा रिमेक होता आणि काळानुसार या चित्रपटाला कल्ट स्टेटस मिळाले. अक्षय–करीनाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री त्या काळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
अक्षयने या वर्षाची सुरुवात छावा चित्रपटातील औरंगजेबच्या भूमिकेने केली, ज्याने जागतिक स्तरावर तब्बल ₹807 कोटींची कमाई केली. धुरंधरमध्ये डाकू रेहमानची भूमिका साकारत त्याने पुन्हा एकदा अभिनयाची छाप पाडली असून अनेकांनी त्याचे काम रणवीर सिंगपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाने आतापर्यंत ₹193 कोटींची कमाई केली आहे.पुढील काळात अक्षय खन्ना प्रशांत वर्माच्या महाकालीमध्ये शुक्राचार्यची भूमिका साकारणार आहे. तर करीना कपूर मेघना गुलजार दिग्दर्शित दयारामध्ये पृथ्वीराज सुकुमारनसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंधर’मध्ये अक्षयची एन्ट्री का झाली सुपरहिट? या एंट्री ट्रॅकच्या ओळीचा अर्थ घ्या जाणून










