Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड विलन बनूनही प्रेक्षकांचा लाडका, 2025मध्ये या स्टारने दोन्ही चित्रपटांत दाखवला अभिनयाचा दम, बॉक्स ऑफिसवर केली प्रचंड कमाई

विलन बनूनही प्रेक्षकांचा लाडका, 2025मध्ये या स्टारने दोन्ही चित्रपटांत दाखवला अभिनयाचा दम, बॉक्स ऑफिसवर केली प्रचंड कमाई

2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरले. एका बाजूला मोठ्या बजेटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका केला, तर दुसऱ्या बाजूला काही चित्रपटांच्या पुन्हा प्रदर्शित आवृत्तींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो एकच स्टार — अक्षय खन्ना. अनेक वर्षांनी दमदार पुनरागमन करत अक्षयने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर सोशल मीडियावरही पुनश्च आपली जोरदार उपस्थिती नोंदवली.

‘धुरंधर’ या चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकॉइट या नकारात्मक भूमिकेने त्याची लोकप्रियता पुन्हा शिगेला पोहोचली. दहशतवादी नेत्याची भूमिका असूनही, स्क्रीनवर तो ज्या सहजतेने आणि तीव्रतेने अवतरला, त्याने इतर कलाकारांचा झगमगाटही फिका पडला. रणवीर सिंगसारख्या स्टारलाही अक्षयच्या परफॉर्मन्सने मागे टाकल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली. याहूनही गाजला तो त्याचा FA9LA गाण्यावरचा एक्शन आणि स्टाईलने भरलेला डान्स, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अक्षयची चाल, त्याची गंभीर उपस्थिती आणि भेदक अभिनय — प्रेक्षकांना अक्षयची ही नव्याने उलगडलेली शैली अक्षरशः मोहून टाकत आहे.

‘धुरंधर’पूर्वीही अक्षय खन्ना (Akshay Khanna)चर्चेत होता, तेही विकी कौशल अभिनीत ऐतिहासिक चित्रपट छावा’ मुळे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अक्षयने मुघल शासक औरंगजेबाची भूमिका अप्रतिम साकारली. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि देशांतर्गत ₹601 कोटी तसेच जगभरात तब्बल ₹807 कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला. अक्षयचा अभिनय या यशाचा एक महत्त्वाचा आधार मानला जातो.

अक्षय खन्नाच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर, 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’मधून पदार्पण केलेल्या या अभिनेत्याला पहिल्या चित्रपटात यश मिळाले नाही. पण त्याच वर्षी आलेल्या बॉर्डर ने त्याला घराघरात पोहोचवले. ‘ताल’, ‘दिल चाहता है’, ‘हमराझ’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘दृश्यम 2’ अशा अनेक प्रकारच्या भूमिकांनी अक्षयने आपल्या अभिनयाची बहुमुखी क्षमता सिद्ध केली आहे.

2025 मध्ये ‘छावा’ आणि ‘धुरंधर’मुळे अक्षय खन्नाने पुन्हा एकदा दाखवून दिले की दमदार परफॉर्मन्स आणि दर्जेदार भूमिका असतील तर प्रेक्षक नेहमीच मनापासून दाद देतात. या वर्षीच्या सर्वात प्रभावशाली कमबॅक स्टारचा मान त्यालाच मिळतोय, यात शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘मॉम्स नाईट आउट…’: मुलगी सरायाह जन्मानंतर कियारा अडवाणीची सोशल मीडियावर वापसी

हे देखील वाचा