आज शनिवार असून वीकेंडची सुरुवात झाली आहे. या सुट्टीत काहीतरी वेगळे, थरारक आणि अंगावर शहारे आणणारे पाहायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘खौफ’ ही हॉरर वेब सीरीज अजूनही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच या सीरीजने प्रेक्षकांना अक्षरशः धडकी भरवली होती आणि आजही ती तितकीच लोकप्रिय आहे.
‘खौफ’(Khouf) ही हॉरर सीरीज स्मिता सिंह यांनी तयार केली असून, यात मोनिका पवार, रजत कपूर आणि चुम दरांग यांसारख्या दमदार कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सीरीजला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगली दाद मिळाली असून, आयएमडीबीवर तिला 7.1 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे.
या सीरीजची कथा एका तरुणीभोवती फिरते, जी दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायला येते. तिला मिळणाऱ्या खोलीवर काही शैतानी शक्तींचे सावट असते. या खोलीचा एक भयानक इतिहास असून, तो हळूहळू उलगडत जातो. सीरीजमध्ये त्या तरुणीच्या भूतकाळातील भीतीदायक अनुभवही प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत. अनेक दृश्ये अशी आहेत की प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो आणि अंगावर काटा येतो.
या सीरीजमध्ये ‘बिग बॉस 18’ची स्पर्धक चुम दरांग हिनेही महत्त्वाची भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. आठ एपिसोड्सची ही सीरीज प्रत्येक भागात नवे ट्विस्ट घेऊन येते, ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. ‘खौफ’चे लेखन स्मिता सिंह यांनी केले असून, पंकज कुमार आणि सूर्या बालाकृष्णन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या सीरीजमध्ये रजत कपूर, मोनिका पवार, अभिषेक चौहान, गीतांजली कुलकर्णी आणि शिल्पा शुक्ला यांसारखे अनुभवी कलाकारही झळकले आहेत. ‘मॅचबॉक्स शॉट्स’च्या बॅनरखाली ही सीरीज तयार करण्यात आली आहे.
कथेतील सर्वात गूढ आणि भयानक घटक म्हणजे खोली क्रमांक 333. ग्वाल्हेरहून दिल्लीला आलेल्या एका मुलीला ही खोली मिळते. मात्र ही खोली शैतानी शक्तींनी भरलेली असून, तिचे आयुष्य भयावह वळण घेते. या खोलीत घडणाऱ्या खौफनाक घटना पाहून प्रेक्षकांची झोप उडते. त्यामुळे हॉररप्रेमींसाठी ‘खौफ’ ही सीरीज वीकेंडसाठी एक परफेक्ट निवड ठरू शकते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘चमकिला’नंतर पुन्हा इम्तियाज अलींसोबत काम करतोय दिलजीत दोसांझ; फोटो शेअर करत दिला अपडेट










