[rank_math_breadcrumb]

नोरा फतेहीचा अपघात, कार्यक्रमाला जात असताना मद्यधुंद चालकामुळे दुर्घटना

मुंबईत शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना नोरा फतेहीचा (Nora Fatehi)अपघात झाला. ती आंतरराष्ट्रीय डीजेडेविड गुएटा के शो सनबर्न फेस्टिवलसाठी जात असताना एका मद्यधुंद चालकाने तिच्या कारला धडक दिली. अपघातानंतर परिस्थिती गंभीर वाटत असल्याने नोराच्या टीमने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांनी नोराची सखोल तपासणी केली. अंतर्गत रक्तस्त्राव किंवा मेंदूला इजा झाली आहे का, हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात आला. सुदैवाने तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही. डॉक्टरांनी तिला केवळ सौम्य दुखापत झाल्याचे सांगितले आणि काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

तथापि, आपल्या कामाविषयी असलेल्या जबाबदारीमुळे आणि चाहत्यांप्रती असलेल्या प्रेमामुळे नोरा फतेहीने विश्रांतीऐवजी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. अपघातानंतर त्याच रात्री उशिरा तिने सनबर्न 2025 या भव्य संगीत महोत्सवात हजेरी लावली. तिची ही जिद्द आणि व्यावसायिक वृत्ती चाहत्यांनी विशेष कौतुकाने घेतली.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात करणारा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्याविरोधात दारू पिऊन गाडी चालवणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या नोराची प्रकृती स्थिर असून ती सुरक्षित आहे.

दरम्यान, गोव्यात पारंपरिकपणे होणारा सनबर्न फेस्टिव्हल यावर्षी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. 19 आणि 20 डिसेंबरपासून सुरू झालेला हा तीन दिवसांचा कार्यक्रम 21 डिसेंबर रोजी संपणार आहे.

वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाले तर, नोरा फतेही अलीकडेच आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांच्या “थामा” चित्रपटातील एका विशेष गाण्यात झळकली होती. याशिवाय ती लवकरच “केडी: द डेव्हिल” या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. अभिनय, नृत्य आणि लाइव्ह परफॉर्मन्सेसमधून नोरा सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘धुरंधर’ ठरला नेटफ्लिक्सवर विकला जाणारा सर्वात महागडा हिंदी चित्रपट, ओटीटी डीलने ‘पुष्पा २’ लाही टाकले मागे