Wednesday, January 14, 2026
Home अन्य मुंबईत आशियाई चित्रपट महोत्सव ९ जानेवारीपासून,‘मयसभा’, उत्तर’ आणि ‘गोंधळ’ यांसह ५० देशांच्या चित्रपटांची मेजवानी

मुंबईत आशियाई चित्रपट महोत्सव ९ जानेवारीपासून,‘मयसभा’, उत्तर’ आणि ‘गोंधळ’ यांसह ५० देशांच्या चित्रपटांची मेजवानी

चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईमध्ये शुक्रवार ९ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांमधील वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांचा यंदा महोत्सवात समावेश असल्यानं सिनेप्रेमींसाठी ही मेजवानी ठरेल.

यंदाच्या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण आहे ते मराठमोळ्या कलावंताचे सिनेमे. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी सिनेमा ‘मयसभा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा ‘उत्तर’ (Uttar)आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ आदी कलाकृतींचा समावेश आहे. सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

निवडलेले चित्रपट प्रभादेवीतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. ९ दिवसांच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे सशुल्क रजिस्ट्रेशन आजच करा आणि एकापेक्षा एक लक्षणीय चित्रपटांचा आनंद घ्या. अतिशय वाजवी शुल्कात प्रतिनिधी नोंदणीकरण्यासाठी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही जर प्रभात चित्र मंडळाचे सभासद असाल तर तुम्हाला खास सवलत आहेच.

महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
भक्ती की काही वेगळंच? भजनादरम्यान अभिनेत्रीची अवस्था पाहून नेटकरी हादरले, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा