‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिलिंद चंदवानीसोबत लग्न झाल्यानंतर अविकाच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता स्वतः अविकाने या अफवांवर पूर्णविराम दिला आहे.
एका मुलाखतीत अविका गौरने (Avika Gor)स्पष्ट शब्दांत प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. ती म्हणाली, “या सर्व प्रेग्नेंसीच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. यात कोणतीही तथ्य नाही.” मात्र, तिच्या या उत्तरात एक ट्विस्ट होता. अविकाने चाहत्यांना सूचक इशारा देत सांगितले की, लवकरच काहीतरी वेगळी आणि खास बातमी समोर येणार आहे.
अविका आणि मिलिंद यांनी अलीकडेच एक कँडिड व्लॉग शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही आयुष्यातील नव्या सुरुवाती आणि मोठ्या बदलांबद्दल बोलताना दिसले. अविकाच्या आणि मिलिंदच्या वक्तव्यामुळे ‘आम्ही कधीच प्लॅन न केलेला बदल’ या विधानामुळे चाहत्यांनी दोघे आई-वडील होणार असल्याचा अंदाज लावला आणि कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांची प्रेमकहाणीही चर्चेचा विषय ठरली होती. जून 2025 मध्ये त्यांनी साखरपुडा जाहीर केला आणि त्यानंतर ‘पती पत्नी आणि पंगा’ या रियालिटी शोच्या सेटवरच हिंदू पद्धतीने विवाह केला. हा विवाह 30 सप्टेंबर 2025 रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता. दरम्यान, प्रेग्नेंसीच्या चर्चांवर पडदा पडला असला तरी, अविकाच्या “काहीतरी वेगळं येणार आहे” या वक्तव्यामुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र अजूनही शिगेला पोहोचली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बर्थडे स्पेशल: दिग्दर्शक, अभिनेता, गायक आणि निर्माता- फरहान अख्तरचा यशस्वी प्रवास










