थलापती विजय यांची आगामी पॉलिटिकल अॅक्शन फिल्म ‘जना नायकन’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. दक्षिणेकडील प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणारी ही फिल्म काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता मद्रास हायकोर्टाकडून चित्रपटाला UA 16+ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, ही फिल्म हिंदीतही पाहायला मिळणार का?
‘जना नायकन’ (Jana Nayagan)हा चित्रपट हिंदीमध्ये ‘जन नेता’ या नावाने रिलीज केला जाणार आहे. ही फिल्म पैन-इंडिया स्वरूपात हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा ट्रेलरही हिंदीत रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘जन नेता’ या हिंदी टायटलची घोषणा करण्यात आली होती. आधी हा चित्रपट 9 जानेवारीला सर्व भाषांमध्ये एकाचवेळी रिलीज होणार होता, मात्र सर्टिफिकेटविषयक वादामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली. नवीन रिलीज डेटबाबत अद्याप मेकर्सकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘जना नायकन’ ची रिलीज CBFC सर्टिफिकेट आणि कोर्टातील प्रकरणामुळे थांबवण्यात आली होती. मात्र आता मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय देत फिल्मवरील अडथळा दूर केला आहे. कोर्टाने स्पष्ट केले की CBFC चेअरपर्सन यांना फिल्म रिव्ह्यू कमिटीपुढे पाठवण्याचा अधिकार नव्हता. 6 जानेवारीला जारी केलेले CBFC चे पत्र रद्द करत तात्काळ UA 16+ सर्टिफिकेट देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
3 जानेवारीला रिलीज झालेल्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी ‘जना नायकन’ हा बालकृष्ण यांच्या तेलुगू फिल्म ‘भगवंत केसरी’ चा रिमेक असल्याचा दावा केला होता. मात्र दिग्दर्शक एच. विनोद यांनी या चर्चांना पूर्णविराम देत, संपूर्ण फिल्म पाहिल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये, असे स्पष्ट केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










