Tuesday, January 13, 2026
Home बॉलीवूड ओ’रोमियो’चा टीझर; हातात गजरा, कानात बाली.. शाहिद कपूरचा भन्नाट अवतार, टीझर पाहून ‘कबीर सिंह’ विसराल

ओ’रोमियो’चा टीझर; हातात गजरा, कानात बाली.. शाहिद कपूरचा भन्नाट अवतार, टीझर पाहून ‘कबीर सिंह’ विसराल

2026 मध्ये आणखी एक दमदार अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची फ्रेश जोडी असलेला ‘ओ’रोमियो’ मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. विशेष बाब म्हणजे समीक्षकांनी गौरवलेले दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांची ही एकत्रित चौथी फिल्म आहे. सत्य घटनांवर आधारित असलेली ही एक रोमांचक प्रेमकहाणी आहे.

शाहिद कपूर स्टारर ‘ओ’रोमियो’चा टीझर आज, 11 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. 1 मिनिट 35 सेकंदांचा हा टीझर पाहून प्रेक्षकांना ‘कबीर सिंग’ची आठवण होते. टीझरची सुरुवात एका शिपवर उभ्या असलेल्या शाहिद कपूरपासून होते. काऊबॉय हॅट, ब्लॅक वेस्ट, अंगावर टॅटू आणि अतिशय हिंसक अंदाजात शाहिद ‘छोटू’ला हाक मारत समोर येतो आणि गोळीबार सुरू करतो. शाहिदचा हा हटके, रॉ आणि किलर लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये शाहिदसह नाना पाटेकर, दिशा पाटनी, विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया, फरीदा जलाल आणि अविनाश तिवारी यांचीही झलक पाहायला मिळते. विशेषतः फरीदा जलाल यांचा संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीझरच्या शेवटच्या भागात तृप्ती डिमरीची एंट्री होते आणि शाहिदच्या (shahid)पात्राचा रोमँटिक, सॉफ्ट पैलू समोर येतो. तृप्तीसाठी असलेली त्याची तळमळ आणि प्रेम डोळ्यांतून स्पष्ट दिसते. विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘ओ’रोमियो’ हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘जना नायकन’पूर्वी थलापती विजयचा सुवर्णकाळ, सलग सात सुपरहिट चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा केला पार

हे देखील वाचा