Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड नुपुर-स्टेबिनच्या रिसेप्शनला ग्लॅमरचा तडका, कृति सेननचा सौंदर्यजलवा; तर रणबीर-आलियाची ग्रँड एन्ट्री चर्चेत

नुपुर-स्टेबिनच्या रिसेप्शनला ग्लॅमरचा तडका, कृति सेननचा सौंदर्यजलवा; तर रणबीर-आलियाची ग्रँड एन्ट्री चर्चेत

कृती सेननची बहीण नुपूर सेनन हिने शनिवारी गायक स्टेबिन बेन याच्याशी लग्नगाठ बांधली. मुंबईपासून दूर उदयपूरमध्ये या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग केली. प्रथम ख्रिश्चन पद्धतीने आणि त्यानंतर हिंदू रीतिरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाचे इनसाइड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

भव्य विवाहानंतर मंगळवारी सर्वजण मुंबईत परतले. त्यानंतर नुपूर (Nupur)आणि स्टेबिन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी.

रिसेप्शनमधील नुपूर सेनन आणि स्टेबिन बेनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. स्टेबिनने ब्लॅक आउटफिट परिधान केला होता, तर नुपूरने डीप मरून रंगाचा गाऊन घातला होता. स्मोकी आय मेकअप, बन हेअरस्टाइल आणि न्यूड शेड लिपस्टिकसह नुपूरने आपला लुक पूर्ण केला होता. मॅचिंग ज्वेलरीमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही या रिसेप्शनला उपस्थित होते. रणबीरने ब्लॅक कुर्ता-पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते, तर आलिया पांढऱ्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती. त्यांच्या स्टायलिश एन्ट्रीमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.

बहिणीच्या रिसेप्शनमध्ये कृती सेनन ‘परम सुंदरी’ बनून चमकली. तिने ऑलिव्ह रंगाची व्हेल्वेट साडी स्लीव्हलेस ब्लाउजसोबत परिधान केली होती. ओपन हेअरस्टाइल आणि साध्या मेकअपमध्ये कृती अत्यंत सुंदर दिसत होती. तिने नुपूर आणि स्टेबिनसोबत फोटो काढत खास क्षण एन्जॉय केले.

या रिसेप्शनला नील नितीन मुकेश पत्नी रुक्मिणी सहायसह, करिश्मा तन्ना पती वरुण बंगेरासोबत, अंकिता लोखंडे-विक्की जैन, रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी, दिशा पाटनी, मौनी रॉय आणि अभिषेक बजाज यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नुपूर आणि स्टेबिनचा हा ग्रँड रिसेप्शन सोहळा सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
प्रियांका चहर चौधरी हिचा सुंदर लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा