Friday, January 16, 2026
Home अन्य चीटिंगच्या आरोपांदरम्यान करण औजला पत्नी पलकसोबत क्वालिटी टाइम घालताना दिसला, फोटो व्हायरल

चीटिंगच्या आरोपांदरम्यान करण औजला पत्नी पलकसोबत क्वालिटी टाइम घालताना दिसला, फोटो व्हायरल

सिंगर करण औजला अलीकडे वादामुळे चर्चेत आला आहे. अमेरिकेतील आर्टिस्ट आणि रॅपर मिस गोरी हिने असा आरोप केला आहे की, 2023 मध्ये पलक औजलाशी लग्न झाल्यानंतरही करण तिच्यासोबत सीक्रेट रिलेशनशिपमध्ये होता. यानंतर एका ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी डीजेनेही करण आपल्याला मेसेज करत असल्याचा दावा केला. मात्र या संपूर्ण वादाच्या काळात करणला पत्नी पलकचा पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतो आहे.

सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये करण औजला (Karan Aujla)पत्नी पलकसोबत वादांपासून दूर पलक घालवत असल्याचे दिसत आहे. पलक औजलाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती घोड्यासोबत दिसते. त्यानंतर तिने करणचा फोटोही शेअर केला. या पोस्टमधून दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे स्पष्ट होते. मात्र या वादावर करण किंवा पलक यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

अमेरिकेत राहणाऱ्या मिस गोरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत करण औजलावर सीक्रेट रिलेशनशिपचे आरोप केले होते. तिच्या पोस्टमध्ये तिने दावा केला की, या प्रकरणाची दखल कॅनडा आणि अमेरिकेतील पोलीस घेत आहेत. तसेच तिच्याबाबत खोटे गुन्हेगारी आरोप पसरवण्यात आल्याचाही तिने उल्लेख केला. हा पोस्ट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

मिस गोरीच्या आरोपांनंतर djswanmusik नावाच्या ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी डीजेसह आणखी काही महिलांनीही करण औजला आपल्याला डायरेक्ट मेसेज पाठवत असल्याचे दावे केले. या सगळ्या आरोपांनंतर सोशल मीडियावर करणला ट्रोल केले जात असले तरी अनेक चाहते त्याच्या समर्थनातही उतरले आहेत. दरम्यान, या वादांच्या पार्श्वभूमीवर करण औजला सध्या आपल्या कुटुंबावर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बॉलिवूड दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत आर्थिक फसवणूक;चित्रपटासाठी फंडिंगच्या नावाखाली 2.5 लाखांचा गंडा

हे देखील वाचा