[rank_math_breadcrumb]

लाश बदलण्याच्या खेळात मोठा गोंधळ! 9.6 IMDb रेटिंगची ही डार्क कॉमेडी शेवटपर्यंत खिळवून ठेवेल,तर इथे पाहाता येईल हि फिल्म

OTT प्लॅटफॉर्ममुळे साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट आता केवळ दक्षिण भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. हिंदीपेक्षा साऊथ चित्रपटांची चर्चा आता उत्तर भारतातही अधिक होताना दिसते. कारण प्रेक्षकांची नवनवीन आणि वेगळ्या कंटेंटची भूक वाढली असून, भाषा आणि जॉनरची बंधने तोडून ते चित्रपट पाहायला उत्सुक आहेत.

अलीकडेच OTT वर साऊथची एक भन्नाट क्राईम कॉमेडी (डार्क कॉमेडी) फिल्म रिलीज झाली आहे, जी याआधी थिएटरमध्येही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून गेली होती. आजपासून ही फिल्म OTT वर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला तब्बल 9.6 IMDb रेटिंग मिळाली आहे, जी पाहून अनेकांना विश्वास बसणार नाही. यावरूनच या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळाल्याचे स्पष्ट होते.

या चित्रपटाचे नाव ‘गुरराम पापी रेड्डी’ असे आहे. नाव जितके वेगळे आणि इंटरेस्टिंग आहे, तितकीच मजेशीर आणि गुंतागुंतीची याची कथा आहे. हा चित्रपट क्राईम कॉमेडी म्हणजेच डार्क कॉमेडी प्रकारात मोडतो, जो भारतीय सिनेमात फार कमी पाहायला मिळतो.

चित्रपटात नरेश अगस्त्य आणि फरिया अब्दुल्ला मुख्य भूमिकेत दिसतात. दिग्दर्शनाची धुरा मुरली मनोहर यांनी सांभाळली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन ब्रह्मानंदम या चित्रपटात जजच्या भूमिकेत दिसणार असून, तमिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडियन योगी बाबू (yogi babu)यांनी या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. समीक्षकांनी कलाकारांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले असून, कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते, असे मत व्यक्त केले आहे.

कथा गुरराम पापी रेड्डी या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जी नरेश अगस्त्य साकारत आहेत. गुरराम एका चिटफंड कंपनीत पैसे गुंतवतो, मात्र कंपनी बुडाल्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकतो. यानंतर तो सौदामिनी (फरिया अब्दुल्ला) आणि गोयी, चिपीली व मिलिट्री या आणखी तीन जणांसोबत हातमिळवणी करतो.

या पाच जणांचा एकच अजेंडा असतो— श्रीशैलम येथून एक मृतदेह आणणे. मात्र हे काम जितके सोपे वाटते, तितके प्रत्यक्षात अजिबात नसते. मृतदेह हैदराबादला आणून दफन करायचा आणि त्याच्या जागी दुसऱ्या मृतदेहाची व्यवस्था करायची असते. या प्रक्रियेत अनेक अडचणी उभ्या राहतात आणि कथा जसजशी पुढे जाते, तसतसे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनते.

दरम्यान, या पाच जणांचा सामना एका शाही कुटुंबाशी होतो आणि ते एका मोठ्या प्रॉपर्टी वादात अडकतात. विनोद, थ्रिल आणि ट्विस्ट्सने भरलेली ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. OTT वर काहीतरी वेगळं, हटके आणि धमाल पाहायचं असेल, तर ‘गुरराम पापी रेड्डी’ नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा.

‘एक दिन’मधून साई पल्लवीचा बॉलिवूड डेब्यू, आमिर खानच्या मुलासोबत पहिला लूक समोर; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित