वीर दास, मिथिला पालकर, मोना सिंग, शारिब हाशमी स्टारर ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ आणि वरुण शर्मा-पुलकित सम्राट यांची ‘राहु केतु’ या दोन्ही चित्रपटांनी 16 जानेवारी रोजी एकाच दिवशी चित्रपटगृहात पदार्पण केलं आहे. वेगवेगळ्या जॉनरमधील या दोन्ही सिनेमांना समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आता या दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई समोर आली असून, अपेक्षेपेक्षा आकडे कमी असल्याचं दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळतेय.
‘हॅपी पटेल’ आणि ‘राहु केतु’(Rahu Ketu)मध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर – ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटातून इमरान खानने कमबॅक केला असला तरी, पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक ठरला नाही. वीर दास प्रमुख भूमिकेत असलेल्या या स्पाय-कॉमेडीला अपेक्षेइतकी गर्दी मिळाली नाही. याचं एक कारण म्हणजे त्याच दिवशी प्रदर्शित झालेला पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा स्टारर ‘राहु केतु’, ज्यामुळे प्रेक्षकांची संख्या विभागली गेली.
‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ बॉक्स ऑफिस कलेक्शन – पहिला दिवस – रिलीजपूर्वी मोठी चर्चा असूनही, ‘हॅपी पटेल’ची ओपनिंग कमजोर ठरली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट्सनुसार ही ओपनिंग साधारण म्हणावी लागेल. ऑक्युपन्सी रिपोर्टनुसार सकाळच्या शोमध्ये केवळ 6.44% प्रेक्षक उपस्थित होते आणि पुढील शोमध्येही गर्दी फारशी वाढली नाही. एकूणच भारतात चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 1.25 कोटींचं नेट कलेक्शन केल्याचं समोर आलं आहे.
‘राहु केतु’ बॉक्स ऑफिस कलेक्शन – पहिला दिवससॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘राहु केतु’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात सुमारे 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे प्राथमिक असून त्यात बदल होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा एकूण हिंदी ऑक्युपन्सी रेट 6.90% इतका नोंदवला गेला असून, संध्याकाळी आणि रात्रीच्या शोमध्ये तुलनेने जास्त प्रेक्षक दिसून आले.
एकूणच, ‘हॅपी पटेल’ आणि ‘राहु केतु’ या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिस ओपनिंग अपेक्षेपेक्षा कमी ठरली असून, येत्या दिवसांत वीकेंडला कमाईत वाढ होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


