वीर दास स्टारर ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना चित्रपटातील हलकी-फुलकी कॉमेडी भावली, तर काही प्रेक्षकांना तो फारसा प्रभावी वाटला नाही. मात्र, आमिर खान यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केल्याबद्दल काहींनी त्यांचे कौतुक केले आहे. अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्स यांचा मेळ असलेल्या या स्पाय-कॉमेडीच्या पहिल्या तीन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे आता समोर आले आहेत.
‘हॅप्पी पटेल’चा (happy patel)पहिल्या वीकएंडचा कलेक्शन – वीर दास स्टारर हा चित्रपट माउथ-टू-माउथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 1.50 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचा एकूण कलेक्शन 4.35 कोटी रुपये इतके झाले आहे.
3 दिवसांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन
- पहिला दिवस: 1.25 कोटी रुपये
- दुसरा दिवस: 1.60 कोटी रुपये
- तिसरा दिवस: 1.50 कोटी रुपये
- एकूण: 4.35 कोटी रुपये
ऑक्यूपेंसीचा आढावा
18 जानेवारी 2026 रोजी चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्यूपेंसी 13.12% इतकी नोंदवली गेली.
- सकाळचे शो: 8.28%
-
दुपारचे शो: 15.67%
-
संध्याकाळचे शो: 15.53%
-
रात्रीचे शो: 12.98%
एका दिलेल्या मुलाखतीत वीर दास यांनी सांगितले की, ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’चा एकूण बजेट ‘धुरंधर’ आणि ‘इक्कीस’ या चित्रपटांच्या केटरिंग बजेटपेक्षाही कमी आहे. हा चित्रपट वीर दास आणि अमोघ रणदे यांनी लिहिला असून, कवि शास्त्री यांच्यासोबत वीर दास यांनीच दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात वीर दाससोबत मिथिला पालकर, मोना सिंग, शारिब हाशमी आणि सृष्टी तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अल्लू अर्जुनला पाहून भावुक झाली जपानी पोरगी, ‘पुष्पा 2’च्या टोक्यो इव्हेंटचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल


