Wednesday, January 21, 2026
Home अन्य ए. आर. रहमानच्या मुलाने दाखवला पंतप्रधान मोदीसोबतचा व्हिडीओ; अपमान करणाऱ्यांना मुलीने दिला जबरदस्त प्रत्युत्तर

ए. आर. रहमानच्या मुलाने दाखवला पंतप्रधान मोदीसोबतचा व्हिडीओ; अपमान करणाऱ्यांना मुलीने दिला जबरदस्त प्रत्युत्तर

संगीतकार ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलीवूडबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूडमध्ये आपल्याला काम मिळत नसल्याचे सांगत रहमान यांनी यामागे इंडस्ट्रीतील सांप्रदायिक विचारसरणी आणि सत्तांतर कारणीभूत असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून, कमेंट सेक्शनमध्ये अपमानास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.

या कठीण काळात रहमान (Rahman)यांची मुले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेत. याआधी त्यांची मोठी मुलगी खतीजा रहमान हिने वडिलांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. आता त्यांचा मुलगा अमीन रहमान याने थेट ट्रोल्सना उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

अमीन रहमानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ शेअर केला असून, त्यात मोदी ए. आर. रहमान यांना ‘देशाचा अभिमान’ म्हणताना दिसतात. या माध्यमातून अमीनने वडिलांप्रती आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
एका व्हिडीओमध्ये ए. आर. रहमान क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांना अभिवादन करताना दिसत असून, पार्श्वभूमीला ऑस्कर विजेतं ‘जय हो’ हे गाणे वाजत आहे. याशिवाय अमीनने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतानाचा रहमान यांचा फोटोही शेअर केला आहे.

अमीन रहमानने वडिलांचे आणखी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते कोल्डप्लेचे गायक क्रिस मार्टिन यांच्यासोबत परफॉर्म करताना दिसतात. एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणताना ऐकू येतात,
“ए. आर. रहमान यांचे संगीत असो किंवा राजामौली यांची कथा—ही भारतीय संस्कृतीची ओळख बनली आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत.”

ए. आर. रहमान यांची मोठी मुलगी खतीजा हिनेही हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तर लहान मुलगी रहीमा हिने एका भावनिक नोटद्वारे सांप्रदायिक वाद घालणाऱ्या ट्रोल्सवर टीका केली आहे.
रहीमाने लिहिले, “लोकांकडे श्रीमद्भगवद्गीता, कुराण किंवा बायबलसारखे पवित्र ग्रंथ वाचण्यासाठी वेळ नाही, जे प्रेम, शांती, सत्य आणि शिस्त शिकवतात. पण एकमेकांशी भांडणे, टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, चिथावणी देणे आणि अपमान करण्यासाठी भरपूर वेळ आहे.”

रहमान कुटुंबीयांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेक चाहत्यांनी ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

जाकिर खानने कॉमेडीपासून घेतला दीर्घ ब्रेक; शोच्या मंचावर केला धक्कादायक खुलासा, या दिवशी होऊ शकतो शेवटचा शो

हे देखील वाचा